शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चांदोलीला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : शिवाजीराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:39 IST

मणदूर (ता. शिराळा) येथील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, हणमंतराव पाटील, बाळासाहेब पाटील, वसंत ...

मणदूर (ता. शिराळा) येथील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, हणमंतराव पाटील, बाळासाहेब पाटील, वसंत पाटील, मोहन पाटील, प्रकाश जाधव, एन. डी. लोहार आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणावती : चांदोली धरण परिसर पर्यटकांच्यादृष्टीने विकसित करून स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले असून या विभागाला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.

मणदूर (ता. शिराळा) येथील सामाजिक सभागृह उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख होते. सरपंच वसंत पाटील यांनी स्वागत केले.

नाईक म्हणाले, चांदोलीसह या विभागाचा विकास साधण्याचा प्रयत्न शिवाजीराव देशमुख व आम्ही सर्व मंडळींनी केलेला आहे. नैसर्गिकदृष्ट्या अनेक अडचणी असतानाही त्यावर मार्ग काढत या विभागाचा विकास साधण्याचा प्रयत्न झालेला आहे. शासनाच्‍या अनेक योजनांमधून निधी उपलब्ध करून पायाभूत विकास साधलेला आहे. पर्यटनाच्यादृष्टीने नवनवीन प्रकल्प राबवत लोकांची पसंती मिळविण्याच्यादृष्टीने नियोजन केलेले आहे. यातून पर्यटक वाढीला चालना मिळून स्थानिक नागरिकांना रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.

सत्यजित देशमुख म्हणाले, चांदोली धरणामुळे या विभागाला वेगळे वैभव प्राप्त झालेले आहे. या विभागाच्या विकासाची संकल्पना शिवाजीराव देशमुख व शिवाजीराव नाईक यांनी कायम ठेवल्यामुळे या परिसराचा विकास झाला.

यावेळी तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, माजी सभापती हणमंतराव पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, पी. के. सुर्वे, एम. ए. थोरात, मोहन पाटील, प्रकाश जाधव, आनंदराव पाटील, एन. डी. लोहार, नाना पाटील, पांडुरंग पाटील, धनाजी पाटील, विजय महाडिक, पांडुरंग कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.