शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बदलते हवामान हापूससाठी परिणामकारक

By admin | Updated: December 15, 2015 00:40 IST

मुराद बुरोंडकर : दिल्लीत वनस्पती शरिर क्रिया शास्त्राबाबत आंतरराष्ट्रीय परिषद

दापोली : कोकणातील बदलते हवामान हापूसला घातक असून, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हापूस आंबा पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. वनस्पती शास्त्राशी निगडीत अभ्यासाची गरज असल्याचे मत वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांनी व्यक्त केले. वनस्पती शरीरक्रिया शास्त्र या विषयाच्या तिसऱ्या जागतिक परिषदेत दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विश्व विद्यालयात सोमवारी झालेल्या परिषदेत ते बोलत होते.दिल्ली येथे जागतिक वनस्पती शरीरक्रिया शास्त्र परिषद ११ ते १४ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगातील २० राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता. या परिषदेत ७०० शास्त्रज्ञ प्रतिनिधी, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.दिल्लीतील या आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर, डॉ. नितीन गोखले, डॉ. अविनाश शिंदे, प्रा. महेश कुलकर्णी, डॉ. अरुण माने यांची निवड करण्यात आली होती. बदलते हवामान आणि पुढील दिशा या विषयावर वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांनी या परिषदेत व्याख्यान दिले. परिषदेतील व्याख्याते म्हणून डॉ. बुरोंडकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कोकणातील बदलते हवामान व हापूसवर होणारा परिणाम हे संशोधन त्यांनी या परिषदेत मांडले.वनस्पती जीवनशास्त्रातील बदलते हवामान व भविष्यातील आव्हाने यासाठी वनस्पती शास्त्रज्ञांनी एकत्र येण्याची गरज आहे. शास्त्रज्ञाने बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी संशोधनातून मात करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचा सूर या परिषदेत शास्त्रज्ञांनी काढला. वनस्पती जीवशास्त्रातील हवामानाच्या बदलामुळे येणाऱ्या अडथळ्याचा सक्षमपणे सामना करण्याचे आव्हान पेलण्यासाठी जागतिक एकजुटीची गरज असल्याचे मत अनेक शास्त्रज्ञांनी मांडले.आंतरराष्ट्रीय वनस्पती जीवशास्त्र या परिषदेचे अध्यक्ष गोविंदजी यांनी उद्घाटन केले. जगद्विख्यात शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिषदेत शास्त्रज्ञांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.कोकणातील हापूस आंब्यावरील बदलत्या हवामानामुळे होणारे परिणाम व भविष्यातील आव्हाने या विषयाचा परिषदेत सहभाग होता. (प्रतिनिधी)जगातील २० राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांचा सहभाग.परिषदेत ७०० शास्त्रज्ञ प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचा सहभाग.वनस्पतीच्या शरिरावर हवामानाच्या बदलामुळे येणाऱ्या अडथळ्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी जागतिक एकजुटीची गरज; शास्त्रज्ञांचे मत.