शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

विट्यात अपहरण करून एकास बेदम मारहाण

By admin | Updated: February 7, 2015 00:11 IST

परस्परविरोधी फिर्याद दाखल : शिवाजी चौकात रास्ता रोकोचा प्रयत्न; किरकोळ वादाने तणाव

विटा : मोटार व्यवस्थित चालव, असा सल्ला दिल्यावरून चौघांनी रामचंद्र धोंडिराम साबळे (वय ४६, रा. आंबेडकरनगर, विटा) यांना जातीवाचक शिवीगाळ करीत अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना आज (शुक्रवारी) सकाळी ८.१५ वाजता येथे घडली. या घटनेनंतर आंबेडकरनगर, फुलेनगर, मायाक्कानगर, नेहरूनगर येथील तरुणांनी संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी सागर भानुदास चोथे, राहुल चंद्रकांत जाधव, संदीप दाते व अभिजित चंद्रकांत आदाटे (सर्व रा. विटा) या चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेनंतर दुपारी साडेबारा वाजता संशयित सागर चोथे याचे लेंगरे रस्त्यावरील लकीसागर टाईल्सचे दुकान व दुचाकी फोडून सुमारे १ लाख ६० हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी रामचंद्र साबळे यांचा मुलगा मयूर रामचंद्र साबळे याच्यासह अनोळखी तिघांविरुध्दही सागर चोथे याचा भाऊ महेश चोथे यांनी फिर्याद दिल्याने परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.येथील रामचंद्र साबळे नगरपरिषदेत सफाई कर्मचारी आहेत. दि. ५ रोजी सायंकाळी ते घरी निघाले असता, सागर चोथेने मोटार आडवी मारल्याने साबळे यांनी त्याला ‘गाडी व्यवस्थित चालव’, असे सांगितल्यानंतर वादावादी झाली. आज, शुक्रवारी, दि. ६ रोजी साबळे दुचाकीवरून कामाला जात असताना मायणी रस्त्यावर सागर चोथे, राहुल जाधव, संदीप दाते व अभिजित आदाटे चारचाकीतून (क्र. एमएच १० बीएम ३७३७) आले. चौघांनी साबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यांना चारचाकी गाडीतून जबरदस्तीने पळवून नेले. गार्डीमार्गे घानवड येथील टेक्स्टाईल पार्कजवळ साबळे यांना पुन्हा मारहाण करून साळशिंगेत नेले. साबळे यांना मारहाण करून त्यांचे अपहरण केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दूरध्वनीवरून या चौघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न साधून साबळे यांना घेऊन येण्याबाबत सूचना केली, परंतु ते आले नसल्याने साळशिंगे येथे धाव घेऊन सागर चोथे यास ताब्यात घेतले. साबळे यांची मुलगी मधुरा साबळे यांनी चौघांविरुध्द जातीवाचक शिवीगाळ, बेदम मारहाण व अपहरण केल्याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी चोथे यास अटक केली. परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)टाईल्सच्या दुकानाची मोडतोडया घटनेनंतर दुपारी साडेबारा वाजता साबळे यांचा मुलगा मयूर याने तीन मित्रांना सोबत घेऊन लेंगरे रस्त्यावरील चोथे याच्या लकीसागर टाईल्सच्या दुकानात येऊन साहित्य व दुचाकीची (क्र. एमएच १० बीसी ९८८) मोडतोड करून महेश चोथे, आई कल्पना यांना मारहाण करून सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद महेश चोथे यांनी दिली.