लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जीएसटी ई-वे बिल तपासणी मोहिमेला सांगली जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली आहे. याप्रकरणी वाहने अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
संपूर्ण राज्यभर ही मोहीम सुरू आहे. सांगली जिल्ह्यात अनेक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. लाखो रुपयांचा कर व दंड वसूल करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अनेक वाहने राज्य जीएसटी कार्यालयाने ताब्यात घेतली आहेत. राज्याअंतर्गत वाहतुकीसाठी १ लाख, तर आंतरराज्य वाहतुकीसाठी ५० हजारांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या असलेल्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी ई-वे बिल काढणे आवश्यक आहे. असे बिल नसेल, तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जीएसटी विभागाने दिला आहे. जूनमधील घटलेल्या जीएसटी वसुलीमुळे आता मोहीम हाती घेण्यात आली आहे.