शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-मीटर’ तपासणी ‘आयटीआय’कडे

By admin | Updated: August 21, 2016 23:57 IST

आरटीओंचा पुढाकार : रिक्षाचालकांच्या आंदोलनास यश

सचिन लाड ल्ल सांगली रिक्षातील ‘ई-मीटर’ तपासणीचा ‘ट्रॅक’ पुन्हा आयटीआय विभागाकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून वजन-मापे विभागाकडून तपासणी केली जात आहे. पण त्यांना तपासणीचा ट्रॅक यशस्वीपणे राबविता आला नाही. त्यामुळे शेकडो रिक्षांचे पासिंग थांबले होते. याविरुद्ध रिक्षाचालकांनी आंदोलने केली. आरटीओ दशरथ वाघुले यांनी या गोंधळाची दखल घेत ई-मीटर तपासणीचा ट्रॅक आता आयटीआय विभागाकडे सोपविला आहे. वजन-मापे विभागास त्यांना यासंदर्भात लेखी पत्रही दिले आहे. रिक्षा तंदुरुस्त आहे की नाही, यासाठी वर्षातून एकदा आरटीओ कार्यालयातून तपासणी (पासिंग) करून घ्यावे लागते. यामध्ये रिक्षातील मीटर सुरू आहे का नाही, याची तपासणी करून त्याचा दाखला आरटीओंना द्यावा लागतो. मीटर तपासणीचे काम पूर्वी आयटीआय कार्यालयाकडे होते. तिथे केवळ ८० रुपये घेतले जात. ६ जून २०१५ पासून मीटर तपासणीचे काम वजन-मापे विभागाकडे सोपविण्यात आले. मुळात या विभागाचे हे काम नाही. तरीही त्यांनी ते स्वीकारले. आठवड्यातील प्रत्येक बुधवारी वजन-मापे विभागाचे अधिकारी शंभरफुटी रस्त्यावर येत असत. तत्पूर्वी रिक्षाचालक मीटर तपासणी करून घेण्यासाठी रांग लावून उभे असायचे. वजन-मापेचे अधिकारी येण्यापूर्वी रिक्षाचालक मीटर दुरुस्ती करणाऱ्या मेस्त्रीकडून मीटरची तपासणी करून घ्यायचे. मेस्त्रीने मीटर चांगले आहे, असे सांगितल्यानंतर अधिकारी रिक्षाचालकांना दाखला द्यायचे. गेले वर्षभर वजन-मापे खात्याचे अधिकारी आठवड्यातून एकदाच मीटर तपासणीला वेळ देत असल्याने, रिक्षाचालकांची गैरसोय झाली होती. शिराळा, आटपाडी, जत या शंभर किलोमीटरच्या गावांवरून रिक्षाचालक येत असत; पण अनेकदा अधिकारीच येत नव्हते. त्यामुळे त्यांना पुन्हा गावाकडे परत जायला लागायचे. एकावेळी रिक्षा घेऊन मीटर तपासणीसाठी यायचे म्हटले तरी, हजार-दीड हजार रुपये खिशात घालून यावे लागायचे. येथे आल्यानंतर आज मीटर तपासणीचा ट्रॅक होणार नाही, असे सांगितले जात होते. गेली वर्षभर असाच प्रकार सुरू आहे. रिक्षाचालक यायचे आणि जायचे; पण अधिकारीच फिरकत नव्हते. रिक्षाचालकांनी चौकशी केली, तर आमचे मूळ कामच जास्त आहे, ते पूर्ण झाल्यानंतर तुमच्या कामाकडे लक्ष देऊ, असे वजन-मापे विभागाचे अधिकारी सांगायचे. पासिंग थांबले : दंड वाढतच गेला... वजनमापे विभागाकडून ई-मीटर तपासणीचे काम वेळेत न झाल्याने शेकडो रिक्षांचे पासिंग थांबले होते. पासिंग वेळेत होत नसल्याने आरटीओंकडून प्रतिदिन २० रुपये दंड आकारला जात होता. शासकीय यंत्रणेच्या या कारभाराचा त्रास रिक्षाचालकांना सहन करावा लागत होता. रिक्षाचालकांना ई-मीटर तपासणी पूर्वीप्रमाणे आयटीआय विभागाकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी करुन अनेकदा आंदोलन केले होते. याची आरटीओ दशरथ वाघुले यांनी दाखल घेतली. तसेच पासिंग का थांबते, याचीही त्यांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांनी ई-मीटर तपासणीचे काम आयटीआय विभागाकडे सोपविले.