शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

दत्त इंडिया देणार एकरकमी एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST

जिल्ह्यातील कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एफआरपीबाबत कडेगाव येथे बैठक झाली होती. त्यावेळी एकरकमी एफआरपी देण्याचे सर्वच साखर कारखानदारांनी ...

जिल्ह्यातील कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एफआरपीबाबत कडेगाव येथे बैठक झाली होती. त्यावेळी एकरकमी एफआरपी देण्याचे सर्वच साखर कारखानदारांनी मान्य केले होते. मात्र हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरी सोनहिरा, उदगिरी शुगर आणि दालमिया वगळता उर्वरित एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी न देता, दोन, तीन हप्त्यांमध्ये बिल देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वसंतदादा कारखाना चालवित असलेल्या दत्त इंडिया कंपनीनेही पहिला हप्ता २५०० रुपये दिला असून, उर्वरित ३९२ रुपयांचा दुसरा हप्ता प्रलंबित आहे. याप्रकरणी कंपनीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गव्हाणीत उड्या मारणार असल्याबाबत निवेदन दिले होते. तरीही प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नव्हती. अखेर शुक्रवारी महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्यासाठी कारखान्यावर धडक मारली; पण कारखान्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. बॅरिकेट्‌स लावून रस्ता अडवला होता. दुपारी बाराच्या सुमारास कार्यकर्त्यांना कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवले. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, व्यवस्थापक शरद मोरे यांनी आंदोलनस्थळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी उर्वरित बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दिवसांत वर्ग केली जातील. तसेच यापुढील ऊस गाळपास येणाऱ्या उसासाठी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली जाईल, असे आश्वासन कंपनीने दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात संदीप राजोबा, पोपट मोरे, संजय बेले, भागवत जाधव, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, राजेंद्र माने, बाळासाहेब जाधव, महेश जगताप, राजू परीट, प्रताप पाटील, संतोष शेळके, काशिनाथ निंबाळकर, मारुती देवकर, दीपक मगदूम आदींसह शेतकरी सहभागी होते.