शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानामुळे पानवेली कोमेजू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:13 IST

दिलीप कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कनरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. दरम्यान, पान उत्पादनात घट आल्याने पान उत्पादक, वाहतूकदार, हमाल आणि विक्रेते ...

दिलीप कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कनरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. दरम्यान, पान उत्पादनात घट आल्याने पान उत्पादक, वाहतूकदार, हमाल आणि विक्रेते यांच्या जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे.पानवेल ही नाजूक वनस्पती असून, पानवेलीच्या जोमदार वाढीसाठी सततचे ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस आणि निचऱ्याची जमीन असावी लागते. पानवेली किमान २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला तग धरतात. मात्र वाढणाºया तापमानाचा घातक परिणाम पानवेलींवर दिसू लागतो. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील काही भागातून पाहावयास मिळते. यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश आहे.सांगली जिल्ह्यात २२४ हेक्टर क्षेत्रावर खाऊच्या पानमळ्यांची लागण केली आहे. यापैकी मिरज तालुक्यातील १९८ हेक्टर क्षेत्रात पानवेलींची लागवड केली आहे. केवळ नरवाडला १०० हेक्टर क्षेत्रावर पानमळ्याची लागण झाली आहे. म्हणून या क्षेत्राला पानमळ्यांचे आगार समजले जाते. येथूनच संपूर्ण राज्यात पाने विक्रीसाठी पाठविली जातात. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, राजकोट (गुजरात), लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर आदी प्रमुख पान बाजारपेठांना खाऊची पाने एजंटाकडून मागवून वाहतूक केली जाते. तसेच यावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हातालाही काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.उन्हाचा पारा आणखी वाढल्यास पानवेलींच्या बुंध्याशी असलेले पानवेलीचे वेटोळे करपून पानवेली वाळून जाण्याची भीती पान उत्पादकांतून व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन आर्थिक फटका बसणार आहे.उत्पादकांसाठी उपाययोजनामिरज तालुक्याचे कृषी अधिकारी एच. एस. मेडीदार यांनी पानवेलींचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.पानमळ्याला उन्हाळ्याच्या कालावधित तुषार सिंचनाचा वापर करावा.पाणी उपलब्ध असल्यास वाफ्याने पाणी द्यावे.पानमळ्याची तटबंदी सेडनेटऐवजी उसाच्या पाल्याने करावी.रसायनांचा वापर पूर्णपणे टाळून सेंद्रीय खतांचा वापर करावा.उन्हाळ्याच्या कालावधित पानमळ्यातील सावली कमी करू नये.