शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या गहिवराने आबांचे स्मरण

By admin | Updated: February 16, 2016 00:17 IST

तासगाव शहरातील चित्र : डिजिटल फलकांतून उमटल्या कार्यकर्त्यांच्या भावना

दत्ता पाटील -- तासगाव --माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाला आज, मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यकर्त्यांनी तासगाव शहरासह गावोगावी डिजिटल फलक उभे केले आहेत. आबांच्या पश्चात तालुक्यातील पाणी योजना ठप्प असल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या दुष्काळाच्या गहिवरानेच कार्यकर्त्यांनी आबांचे स्मरण केल्याचे दिसून येत आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गेल्यावर्षी १६ फेब्रुवारीला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तालुक्यासह जिल्ह्यात आणि राज्यावरही शोककळा पसरली. मात्र आबांच्या राजकारणाच्या सुरुवातीपासून आबांवर प्रेम करणारा सामान्य कार्यकर्ता आजही आबांच्या जाण्याचा धक्का पचवू शकलेला नाही. गेल्या वर्षभरात तालुक्यातील राजकारणासह सर्वच क्षेत्रात अनेक बदल झाले. काही कार्यकर्ते सोडून गेले. काही सत्तास्थाने ताब्यातून गेली, तर काही सत्तास्थाने आणखी भक्कम झाली. आबांच्या निधनाचे दु:ख पचवून त्यांच्या कुटुंबियांनीही हळूहळू तालुक्याची सूत्रे ताब्यात घेतली. मात्र आबांच्या जाण्याने तालुक्याचे आणि कार्यकर्त्यांचे झालेले नुकसान स्पष्टपणे जाणवत आहे.आबांच्या पश्चात तालुक्याच्या वाट्याला वनवास आल्याची भावना सामान्य कार्यकर्त्यांच्या तोंडातून उमटत आहे. आबा असते, तर दुष्काळी परिस्थितीत तालुक्यालाच नव्हे, तर जिल्ह्यालाही भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला नसता. ‘आबा तुम्ही गेलात, पाणी गेलं...’ अशी स्पष्ट भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. आबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गावोगावी आणि तालुकाभर उभारलेल्या डिजिटल फलकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ‘ओसाड माळरानावर जेव्हा पाणी खळखळत जाईल... गावा-गावातील भांडण गावातच सोडवले जाईल... स्वच्छतेसाठी जेव्हा गाव हातात खराटा घेईल... आबा तुमची आठवण येईल’ अशा शब्दांत जागोजागी लावण्यात आलेल्या फलकांवर कार्यकर्त्यांनी भावनांना वाट मोकळी केली आहे.आबांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्ष सोडून काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘फितूर झाले लाख तरी... झुंज आम्ही देणार. .. गद्दारांना गाडून... आबासाहेबांचे विचार पुढे नेणार...’ अशा शब्दांत पक्ष सोडून जाणाऱ्यांवर डिजिटल फलकांच्या माध्यमातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.आबांच्या लोकाभिमुख अभियानांना तडे ‘पाणी गेले... तंटामुक्तीला मुक्ती मिळाली, डान्स बारबाला नाचू लागल्या, मटका सुरू झाला, स्वच्छता अभियान बंद झाले म्हणून आबा परत या... अशाप्रकारे भावनिक साद घालणारे आणि भाजप सरकारच्या कारभारावर आसूड ओढणारे काही डिजिटल फलकही शहरात लावण्यात आले आहेत.