शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

संततधार पावसाने सांगलीत दैना

By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST

जिल्ह्यातही हजेरी : सहा दिवस जनजीवन विस्कळीत

सांगली : गेल्या सहा दिवसांपासून सांगली, मिरजेत संततधार पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसाने शहर परिसरात मात्र दैना उडाली आहे. गेल्या सहा दिवसांत केवळ आज (शनिवारी) दुपारी तीननंतर सूर्यदर्शन झाले. आज (शनिवार) सकाळी साडेअकरा ते दुपारी दोनपर्यंत संततधार होती. काहीकाळ जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नागरिकांनीही भर पावसातच व्यवहार सुरू ठेवले. जिल्हाधिकारी कार्यालय ते न्यायालय आवारात गुडघाभर पाणी साचले होते. त्याचबरोबर जुना स्टेशन रस्ता, शिवाजी मंडई, झुलेलाल चौक, शासकीय रुग्णालय रस्ता, तरुण भारत स्टेडियम परिसर आदी ठिकाणीही गुडघाभर पाणी साचून राहिले होते. दुचाकीस्वारांना रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत होती. गेले सहा दिवस संततधार सुरू राहिल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भिजत जाणे भाग पडले. पावसाने बाजारपेठेत तर दैना उडाली. गणेशोत्सवानिमित्त सजावटीचे साहित्य विकणाऱ्यांना भर पावसातच व्यवसाय करावा लागत आहे. साहित्य भिजून खराब होत आहे. सर्वाधिक फटका रस्त्यावरील स्टॉलधारकांना बसला आहे. दत्त-मारुती रस्त्यावरील विक्रेत्यांना पाण्यात उभे राहूनच व्यवसाय करावा लागत आहे. शाळा महाविद्यालयांसमोरील क्रीडांगणांमध्ये आजही पाणी साचून राहिले होते. तरुण भारत स्टेडियम, छत्रपती शिवाजी स्टेडियम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमला तळ्याचे स्वरूप आले होते. शामरावनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनी, वानलेसवाडी, संजयनगर, अभयनगर, हनुमाननगर आदी उपनगरांमध्ये पावसाने दैना उडवली आहे. सर्वच रस्ते चिखलमय झाले आहेत. मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साचून राहिले आहे. तेथील नागरिकांना घरी जाण्यासाठी नवीन वाट शोधावी लागत आहे. गेल्या सहा दिवसांच्या पावसाने संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावली आहे. कवठेमहांकाळ, आटपाडी, जत आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दुपारनंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती. (प्रतिनिधी)