शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्यात सोयीच्या आघाड्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:24 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : ग्रामपंचायत निवडणूक पक्ष पातळीवर न होता गटांतर्गत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, हुतात्मा सुंकुलाचे वैभव नायकवडी, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख, नानासाहेब महाडिक यांचे गट सक्षम आहेत. या गटांच्या प्रत्येक गावांमध्ये सोयीच्या आघाड्या होणार ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : ग्रामपंचायत निवडणूक पक्ष पातळीवर न होता गटांतर्गत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, हुतात्मा सुंकुलाचे वैभव नायकवडी, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख, नानासाहेब महाडिक यांचे गट सक्षम आहेत. या गटांच्या प्रत्येक गावांमध्ये सोयीच्या आघाड्या होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.राष्ट्रीय आणि राज्य पक्षाबरोबरच शिवसेना, आर. पी. आय., स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना आदी पक्षाचे नेतेही निवडणूकीत पक्षांना सोयीचा पाठिंबा देणार असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाला बगल देत स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी हा निर्णय घेतला आहे.शिराळा येथे माजी आ. मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन भाऊंची ‘समझोता एक्स्प्रेस’ काही अपवादात्मक निवडणुका सोडल्या, तर नेहमीच सुसाट धावल्याचे चित्र आहे. मानसिंगराव नाईक यांच्याकडे संस्था आणि कारखान्याच्या माध्यमातून कामगार शक्ती मोठी आहे. तरीसुध्दा त्यांना काँग्रेसची साथ घ्यावी लागते. या दोघांच्या विरोधात भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्या गटानेही सत्तेच्या जोरावर मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न चालू आहे.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्या गटाची ताकद पाहता, वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक यांनी तर ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी स्थापन करण्याला बगल देत दोन्ही गट आपआपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. याउलट जयंत पाटील हे राजारामबापू उद्योग समूहातील कामगार शक्तीच्या ताकदीवर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार आहेत. परंतु प्रत्येक गावात त्यांच्या पक्षांतर्गत गटांची असणारी धुसफूस हा डोकेदुखीचा विषय असतो. यावेळी जयंत पाटील यांनाच बगल देऊन स्वत:च्या गटाची ताकद दाखविण्यासाठी ग्रामीण भागातील बहुतांशी नेते, कार्यकर्ते सरसावले आहेत. या निवडणुकीत जो निवडून येईल तो आमचाच, अशी भूमिका जयंत पाटील घेणार आहेत.इस्लामपूर पालिकेचे पक्षप्रतोद विक्रमभाऊ पाटील यांनी वाळवा-शिराळा तालुक्यात भाजपला मानणाºया कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. परंतु ग्रामीण भागात अद्यापही विक्रम पाटील यांचा संपर्क म्हणावा तसा नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय कितपत योग्य ठरणार, हे आगामी निवडणूकीत स्पष्ट होईल.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत पाच जागा मिळाल्याने पवार यांची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यामुळे त्यांनीही ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे.स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटना व शेतकरी संघटना या संघटनांच्या निर्णयाकडेही मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या नेत्यांची भूमिका काय असणार, असाही प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होतांना दिसत आहे.