शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्याला मंत्रीपद, महामंडळांची आस -: पुन्हा चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:52 IST

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यामध्ये शंभर दिवसांसाठी का होईना, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय इस्लामपूर मतदार संघातील काही नेत्यांची महामंडळांवर वर्णी लागल्याची

ठळक मुद्देआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राजकीय खेळीची शक्यता

अशोक पाटील ।इस्लामपूर : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यामध्ये शंभर दिवसांसाठी का होईना, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय इस्लामपूर मतदार संघातील काही नेत्यांची महामंडळांवर वर्णी लागल्याची अधिकृत घोषणा होणार आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही भाजपची खेळी असल्याचे बोलले जात आहे.

मागील निवडणूक आमदार नाईक यांनी भाजपचा झेंडा घेऊन निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, शिवाजीरावांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ, असा शब्द दिला होता. या घोषणेला पाच वर्षे होत आली. आता मंत्रिमंडळाच्या शेवटच्या तीन महिन्यांसाठी पुन्हा एकदा १४ जूनरोजी विस्तार केला जाणार आहे. यामध्ये आ. नाईक यांना मंत्रीपदाची संधी मिळेल, अशी शक्यता आहे.इस्लामपूर मतदार संघातील भाजपचे नेते विक्रम पाटील व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव शिंदे यांना यापूर्वीच महामंडळावर घेण्यात आले आहे. परंतु तशी अधिकृत घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली होती. आता दोघांच्या अधिकृत निवडी जाहीर होणार आहेत. यासाठी या दोघांच्याही मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपची खेळी सुरू आहे. शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष डोके वर काढू लागला आहे. आ. नाईक यांनी उभ्या केलेल्या संस्था तोट्यात असल्याचा आरोप राष्टÑवादी आणि काँग्रेसने सुरू केला आहे. त्यांची प्रतिमा ढासळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर उपाय म्हणून शंभर दिवसांसाठी का होईना, आ. नाईक यांना मंत्रीपद देऊन त्यांची प्रतिमा उजळवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

आश्वासनांची पूर्तता होणार का?इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात भाजपला ऊर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद, विक्रम पाटील, वैभव शिंदे यांना महामंडळ, तर महाडिक गटाचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांना उमेदवारीची संधी देण्याचे आश्वासन दिले आहे. याची पूर्तता झाली नाही, तर येथील राजकारण वेगळ्या वळणावर जाणार आहे.

 

१४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानंतर आठ दिवसांत महामंडळावर नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा होणार आहे.- विक्रम पाटील, भाजपचे नेते

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक