शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

मद्यधुंद ट्रक चालकाने तरुणास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:28 IST

फाेटाे : ३१ आटपडी १..२..३..४ आटपाडी : मद्यधुंद अवस्थेतील चालकाने भरधाव ट्रक रस्त्याकडेच्या चहाच्या टपरीत घुसवून एकाला चिरडून ...

फाेटाे : ३१ आटपडी १..२..३..४

आटपाडी : मद्यधुंद अवस्थेतील चालकाने भरधाव ट्रक रस्त्याकडेच्या चहाच्या टपरीत घुसवून एकाला चिरडून ठार केले, तर जिवाच्या आकांताने पळ काढल्याने चौघे बचावले. अपघातात दोन दुचाकीसह टपरी आणि रसवंतीगृहाचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. या अपघातात विक्रमसिंह रवींद्र देशमुख (वय ३२ रा. य. पा. वाडी) या तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी पाेलिसांनी ट्रक चालक शकील इस्माईल कोकणे (वय ५० रा. माळी गल्ली तासगाव) याला अटक केली आहे.

आटपाडीतील साईमंदिर चौकाजवळ मायाक्कानगर आहे. तिथे बुधवारी सकाळी दहा वाजता हा अपघात झाला. अपघातामध्ये चाैकातील जय गणेश टी स्टॉल व रसपानगृह उद्ध्वस्त केले. ग्राहकांच्या मोटारसायकलींचा चुराडा केला. जिवाच्या आकांताने पळाल्याने समाेरील ग्राहक बचावले. साताराच्या सिद्धनाथ ट्रान्सपोर्टचा ट्रक (क्र. एमएच ११ एम ५९२३) शकील इस्माईल कोकणे (वय ३८ रा. माळी गल्ली तासगाव) हा चालवत होता. जालना येथून लोखंडी सळई घेऊन हा ट्रक आटपाडीमार्गे इस्लामपूरला चालला होता. आटपाडी ते भिवघाट रस्त्यावर मायाकानगर येथे आल्यानंतर तो पिनू लवटे यांच्या जय गणेश टी स्टॉलमध्ये घुसला. ताे थेट या ठिकाणी चहा पिण्यासाठी आलेले ग्राहक श्री सिद्धनाथ इरिगेशन अँड हार्डवेअरचे मालक विजयसिंह रवींद्र देशमुख यांच्या अंगावर गेला. ते जागीच ठार झाले. भरधाव ट्रक पाहून तत्काळ बाजूला पळालेले अन्य ग्राहक सुदैवाने बचावले. चहाची टपरी, तसेच रसपान गृह ट्रकने उद्ध्वस्त केले. महादेव निवृत्ती आलदर (रा.कोळे ता.सांगोला) यांची दुचाकी (क्र.एमएच ४५ यु ३४८), तसेच पिनू लवटे यांची दुचाकी(क्र.एमएच १० डीडी ६४६१)चा चुराडा केला.

आटपाडीचे पोलीस निरीक्षक भोरे सहायक निरीक्षक सुधीर पाटील रोहिदास गबाले उपअधीक्षक अंकुश इंगळे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन तपासाबाबत सूचना केल्या. चालक शकील काेकणे याला ताब्यात घेतले. विजयसिंह देशमुख यांचे टायटननगर येथे दुकान आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले हाेते. घटनेची फिर्याद अशोक सोपान लवटे यांनी दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.