शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेयजल योजनेमुळे मुबलक पाणी मिळेल

By admin | Updated: September 2, 2014 23:59 IST

जयंत पाटील : बामणोली नळपाणी पुरवठा योजना

कुपवाड : पुनर्वसित बामणोलीतील ग्रामस्थांना राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे मुबलक प्रमाणात पाणी मिळणार असून, गावाचा पाणीप्रश्नही कायमचा सुटणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी आज केले़ बामणोली (ता़ मिरज) येथे ग्रामपंचायतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते़ कार्यक्रमास माजी आमदार दिनकर पाटील, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, उपसरपंच अंकुश चव्हाण, तुकाराम बामणे, सुभाष चिंचकर, शशिकांत शिंदे प्रमुख उपस्थित होते़यावेळी ग्रामविकासमंत्री पाटील पुढे म्हणाले की, पुनर्वसित बामणोलीच्या विकासासाठी मंजूर झालेली ही पाणी योजना यशस्वीपणे राबवावी, चांगल्या दर्जाचे काम व्हावे़ माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली़ शशिकांत शिंदे यांनी स्वागत केले़ उपसरपंच अंकुश चव्हाण यांनी प्रास्ताविकात, बामणोली पाणी योजनेसाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला असून, त्यातून पाईपलाईन, पाण्याच्या टाकीसह इतर विविध कामे केली जाणार असल्याची माहिती दिली़ रवींद्र शिंदे यांनी आभार मानले़ यावेळी सुभाष चिंचकर यांचा सत्कार करण्यात आला़ विघ्नहर्ता ग्रुपच्यावतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले़ कार्यक्रमास सरपंच सजाताई सावंत, विलास चव्हाण, भालचंद्र पाटील, नगरसेवक शेडजी मोहिते, विष्णू माने, राजू गवळी, इब्राहीम चौधरी, राहुल पवार, जगन्नाथ पाटील, संभाजी जाधव यांच्यासह या परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते़ (वार्ताहर)