शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लढावं की थांबावं हा एकच सवाल आहे..; नाट्यपंढरी सांगलीत रंगला नवा प्रयोग

By अविनाश कोळी | Updated: April 10, 2024 11:53 IST

अविनाश कोळी ‘टू बी ऑर नॉट टू बी... लढावं की थांबावं हा एकच सवाल आहे. या राजकीय उकीरड्यावर खरकट्या ...

अविनाश कोळी‘टू बी ऑर नॉट टू बी... लढावं की थांबावं हा एकच सवाल आहे. या राजकीय उकीरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं, बेशरम, लाचार, आनंदानं की, फेकून द्यावं प्रतिष्ठेचं लक्तर त्यात गुंडाळल्या राजकीय जाणिवेच्या यातनेसह राजकारणाच्या काळ्याशार डोहामध्ये?’ असे काहीसे वेगळेच संवाद पडद्याआडून नाट्यगृहात घुमत होते. प्रेक्षकांच्या कानावर पडणारे हे संवाद नेमके कोणाचे असावेत, याचा अंदाज बांधला जात होता.नाट्यपंढरी सांगलीत अनोखा नाट्यप्रयोग होणार म्हणून राज्यभरातील प्रेक्षक जमलेले. घंटा वाजली, पण पडद्याआडच्या गोंधळाने प्रेक्षकही ताटकळले. ‘कुणी उमेदवारी देता का उमेदवारी’ असा आवाज घुमला. पडदा उघडणार कधी अन् पात्रपरिचय होणार तरी कधी अशा सवालांनी प्रेक्षकांना बैचेन केले. पडदा उघडला, तसा एक लाइट एका योद्ध्यावर पडला. तो आव्हान देत उभा होता, पण दुसऱ्या व तिसऱ्या पात्रांचा विंगेतच ‘संवाद’ सुरू झाला. रंगमंचावरील प्रवेशावरून दोघांमध्ये जुंपली. मुख्य पात्रावरून चाललेले द्वंद्व एव्हाना प्रेक्षकांपर्यंत पोहचले. सूत्रधार कुठे आहे, असा सवालही कुणीतरी हलक्या आवाजात उपस्थित केला. नाट्यलेखकही प्रयोगाला नव्हते. प्रवेश एकाचा होणार की, दोघांचा? याची उत्सुकता ताणली गेली. दिग्दर्शक, सहायक दिग्दर्शक, निर्माते यांच्यातही समन्वय होईना. ग्रीन रूममध्ये बैठक झाली अन् अखेर पैलवान गड्याला रंगमंचावर योद्धा म्हणून पाठविण्यात आले अन् वादावरचा पडदा पडला. दोन पात्रांचा रंगमंचावर वावर सुरू असतानाच ‘मीच तो, मीच तो’ असा आवाज विंगेतून घुमला अन् दोन्ही योद्धे बुचकळ्यात पडले. लढाई कोणी कोणाशी करायची, असा सवाल उपस्थित झाला.पैलवानाने प्रश्नांकीत चेहऱ्याने विंगेत उभारलेल्या दिग्दर्शकाकडे पाहिले. त्यांचा इशारा होताच रणशिंग फुंकल्याचा आवाज आला. संभ्रमाचा धूर रंगमंचावर सोडण्यात आला. याच धुरामध्ये दोन्ही योद्ध्यांनी एकमेकांशी नजरा नजर केली अन् मध्यंतराचा पडदा पडला. प्रेक्षक उठायच्या तयारीत असतानाच एक आवाज घुमला...

‘तुफानाला महाल नको,राजवाड्याचा सेट नको,पदवी नको, हार नको,एक हवी हक्काची खुर्चीतुफानाला बसण्यासाठी’कुणी उमेदवारी देता का उमेदवारी?

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण