शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कलारसिकांकडून रंगरेषांची सफर

By admin | Updated: June 22, 2016 00:11 IST

‘कलाविश्व’चा उपक्रम : विलास टोणपेंच्या कलेचा आस्वाद

सांगली : उत्साहाचा कॅन्व्हास...त्यावर कुंचल्यातून होणारी रंगांची बरसात... हळूहळू जिवंत होऊन रसिकांशी संवाद साधणारे चित्र अशा वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार प्रा. विलास टोणपे यांनी कलाप्रेमी रसिक यांना रंगरेषांची अनोखी सफर घडवून आणली. सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयाच्यावतीने शांतिनिकेतन परिसरात ‘व्यक्तिचित्रांचे रेखाटन व मार्गदर्शन’ याविषयी कार्यशाळा पार पडली. टोणपे यांच्या या कार्यशाळेविषयी कमालीची उत्सुकता कलाकार, रसिकांमध्ये होती. त्यामुळे सांगलीसह इचलकरंजी, कोल्हापूर, इस्लामपूर, कुपवाड येथील कला महविद्यालयातील विद्यार्थी व चित्ररसिकांनी कार्यशाळेस मोठी गर्दी केली होती. मूळचे मराठी भाषिक असलेले परंतु मागील बावीस वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास असलेले टोणपे यांनी माईक हातात घेऊन ‘नमस्कार’ असे म्हटल्यानंतर टाळ््यांचा कडकडाट झाला. मराठीतील संवादाला मिळालेली ही दाद पाहून टोणपे यांनी मराठीतूनच कार्यशाळा घेतली. अवघ्या दोन तासात त्यांनी सांगलीतील प्रसिध्द वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांचे व्यक्तीचित्र हॅण्डमेड कागदावर पेन्सील आणि चारकोलच्या माध्यमातून साकारले. व्यक्तिचित्रांचे महत्त्व, प्रकाशरचना, रंगसंगती, रेखाटनातील बारकावे त्यांनी सविस्तरपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी टोणपे म्हणाले, भारतीय संस्कृतीत ज्ञानदानाला महत्त्वाचे स्थान आहे. ज्ञान ही विकण्याची वस्तू नाही, तर आपल्याकडील ज्ञान दुसऱ्यास विनामूल्य उपलब्ध करुन देणे या संकल्पनेचा आपण स्वीकार केला आहे. यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील, प्राचार्य बाळासाहेब पाटील, सत्यजित वरेकर, महेश पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)महाराष्ट्र माझ्या हृदयात‘कित्येक वर्षे परदेशात असलो तरी मला मराठीचा अभिमान आहे. माझे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य असले तरीही महाराष्ट्र कायम माझ्या हृदयातच आहे’ असे टोणपे यांनी सांगितल्यावर त्याला दाद मिळाली.