शिराळा : शिराळा येथील प्रा. डॉ. विनोद राठोड यांनी संपादित केलेला ‘डॉ. रवींद्र ठाकूर : कादंबरीसमीक्षा’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ तासगाव येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते झाला.
पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र व अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार सोनाळकर, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते बाबूराव गुरव, शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता पाटील, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, रघुनाथ केंगार, सचिव डॉ. प्रकाश दुकळे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शहाजी पाटील, डॉ. तातोबा बदाने यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. विनोद राठोड संपादित ‘डॉ. रवींद्र ठाकूर : कादंबरीसमीक्षा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा झाला.
फाेटाे : ०९ शिराळा १