शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

क्रांतिकारकांच्या स्मारकांची पडझड

By admin | Updated: August 11, 2014 00:16 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : अनेक ठिकाणी दारे, खिडक्या गायब

बिळाशी : स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली. येता स्वातंत्र्यदिनही दिमाखात साजरा होईल. पण स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला, त्या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या स्मारकांची झालेली दयनीय अवस्था डोळ्यात पाणी आणणारी आहे. शिराळा तालुक्यातील बिळाशी, मांगरुळ, आरळा व सोनवडे येथील सर्वच स्मारकांची पडझड झाली असून मोठी दुरवस्था झाली आहे. कसलं स्वातंत्र्य अन् कसलं काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे.१९४७ मध्ये १४ आॅगस्टला मध्यरात्री लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवताना सद्भावना व्यक्त करताना नियतीने केलेल्या कराराची फलोधारणा सफल झाली असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य प्राप्तीला ६७ वर्षे पूर्ण झाली. वसंतदादांनी सांगलीच्या जाहीर सभेत तुरुंग फोडल्याची घटना सांगताना दंडातून गोळी गेल्याचे सांगताच बॅ. ए. आर. अंतुले यांनी दादांच्या त्यागाचा तर गौरव केलाच, परंतु ज्यांनी हौतात्म्य पत्करले, त्या देशभक्तांसाठी हुतात्मा स्मारके उभारण्याचा संकल्प बोलून दाखविला व अंमलातही आणला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्मारके उभारली गेली.पण गेल्या काही वर्षात डागडुजी आणि रंगरंगोटीअभावी हुतात्मा स्मारकांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणच्या फरशा काढून नेण्यात आल्या असून, विजेचे बल्ब वायरिंग याचा पत्ताच नाही. स्मृतिस्तंभ दुभंगले असून, त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी या स्मारकांचा वापर धान्य उन्हात घालण्यासाठी, तर मांगरुळ या ठिकाणी कडबा भरण्यासाठी केल्याचे शिराळा तालुक्यातील चित्र होते.स्मारके स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरित करून देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी दिल्यास हुतात्मांच्या स्मृतींना सन्मानाने जपले जाईल. शिराळा तालुक्यातील मांगरुळ, बिळाशी, आरळा, सोनवडे येथील स्मारके शासनाने त्या-त्या ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करून त्यांची सर्वस्वी जबाबदारी द्यायला हवी. सध्या भरीव निधी देऊन त्यांच्या डागडुजीची गरज आहे. रंगरंगोटी व डागडुजी केल्यास हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा मिळेल. त्याकरिता मानसिकता बदलायला हवी. (वार्ताहर)