शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

दुहेरी की तिहेरी... यावरच विजयाचा गुलाल!

By admin | Updated: June 15, 2014 00:21 IST

महायुतीत इच्छुक वाढले : लोकसभा निवडणुकीने गणिते बदलली

विकास शहा ल्ल शिराळाआधीच तिघांचा दावा, त्यात चौथ्याचा प्रवेश आणि लोकसभा निकालानंतर तर फुटलेले इच्छुकांचे पेव, असे चित्र शिराळा विधानसभा मतदारसंघात दिसू लागले आहे. वर्षभरापासूनच विधानसभेचे पडघम वाजू लागल्याने लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपापली ताकद दाखवून दिली. विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि कॉँग्रेसचे सत्यजित देशमुख हे शिराळ्याचे प्रमुख दावेदार. त्यात आता जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांचाही प्रवेश झाला असून, मनसेचे तानाजी सावंत, भाजपचे प्रतापराव पाटील, सेनेचे संतोष हिरुगडे यांनीही विधानसभेसाठी दंड थोपटले आहे.१९९५ पासून शिराळ्यातील राजकीय घडामोडी वेगवान बनल्या. सतत राजकीय उलथापालथींमुळे हा मतदारसंघ संवेदनशील बनला. ‘बंडखोरीतून आमदारकी’ असे गणित येथे तयार झाले आहे. शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नाईक आणि आता मानसिंगराव नाईक यांची आमदारकी हेच सांगते. विशेष म्हणजे या तिन्ही गटांनी दरवेळी वेगवेगळी आघाडी केली. लोकसभा निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीमच झाली. कारण शिवाजीराव नाईक हे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या, तर आमदार नाईक व देशमुख गट कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रचारयंत्रणेत उतरले होते. आता स्वत:च्या विजयानंतर खा. शेट्टी यांनी शिवाजीराव नाईक यांना विधानसभेत निवडून आणण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. विशेष म्हणजे तिन्ही गटांनी आपापली उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यंदा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार की कॉँग्रेसला यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. मानसिंगराव आणि शिवाजीराव नाईक यांनी यंदा पुन्हा निवडणूक लढवणारच, असे सांगितले आहे, तर सत्यजित देशमुखही काँग्रेसकडे उमेदवारी मागत आहेत. या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावे समाविष्ट आहेत. त्यामुळे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरते. लोकसभा निवडणुकीत ते ‘बॅकफूट’वर गेल्याने आता रंगत वाढली आहे. सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत तिकिटासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यातच जयंत पाटील हे त्यांचे साडू असल्याने त्यांचेही वजन देशमुख यांच्यासाठी उपयोगी ठरेल.गेल्या वर्षभरात पेठचे जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांचे नाव काँग्रेसच्या गोटातून पुढे आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यंदा दुसऱ्यांदा रिंगणात उतरणार आहेत. मोदी लाटेचा फायदा करून घेण्यासाठी भाजपचे प्रतापराव पाटील, शिवसेनेचे संतोष हिरुगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील यांनीही विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.