शिराळा : तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांना आजवर केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोणताही वाईट परिणाम दिसून आलेले नाही. लसीबाबत भीती बाळण्याची गरज नाही, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचा प्रारंभ आमदार नाईक यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, सहायक जिल्हाधिकारी आयुषी सिंह, तहसीलदार गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, युवानेते विराज नाईक, विजयराव नलवडे, उपसभापती बी. के. नायकवडी, सुखदेव पाटील, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, आशाताई झिमुर, अर्चना शेटे, सुनंदा सोनटक्के डॉ. जुबेर मोमीन, डॉ. नितीन जाधव, डॉ. कृष्णा जाधव, डॉ. गायत्री यमगर आदी उपस्थित होते.
फोटो-२९शिराळा२
फोटो ओळ : शिराळा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या प्रारंभप्रसंगी आमदार मानसिंगराव नाईक, सहायक जिल्हाधिकारी आयुषी सिंह आदी उपस्थित होते.