भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील सेकंडरी स्कूल ॲण्ड ज्युनि. कॉलेजचे माजी उपमुख्याध्यापक हणमंत जोशी यांनी भिलवडी
शिक्षण संस्थेस ५० हजार रुपयांची देणगी दिली. संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी ही देणगी स्वीकारली.
एच. आर. जोशी यांनी आपली संस्थेप्रती असणारी भावना मनोगतात मांडली. संस्थेचे संचालक गिरीश चितळे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर संजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे, विश्वस्त जे. बी. चौगुले, संचालक डी. के. किणीकर, डॉ. सुनील वाळवेकर, संजय कदम, जयंत केळकर, वासुदेव जोशी, पर्यवेक्षक संभाजी माने, आजीव सदस्य मानसिंग हाके, एम. आर. पाटील, के. डी. पाटील, एम. बी. पाटील उपस्थित होते.
फोटो-०९भिलवडी१
फोटो ओळ : भिलवडी शिक्षण संस्थेस हणमंत जोशी यांच्याकडून विश्वास चितळे यांच्याकडे देणगी सुपूर्द करण्यात आली. यावेळी जे. बी. चौगुले, डॉ. बाळासाहेब चोपडे, गिरीश चितळे आदी उपस्थित होते.