सांगली : नगरवाचनालयाचे माजी कार्यवाह कुमार भिडे व आजीव सदस्या नीला भिडे यांनी संस्थेला दोन लाख रुपयांची देणगी दिली. दिवंगत लक्ष्मी भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ लाख रुपये ग्रंथ खरेदीसाठी दिले. दिवंगत केशव ऊर्फ दादूकाका भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर वक्तृत्व स्पर्धेसाठीही १ लाख रुपये दिले. संस्थेचे कार्यवाह अतुल गिजरे, सहकार्यवाह सुहास करंदीकर, कार्यकारी सदस्य जनार्दन लिमये यांनी देणगी स्वीकारली.
------------