शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरात घरगुती गॅस पाईपलाईन कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:53 IST

सांगली जिल्ह्याला पाईपद्वारे गॅस पुरवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सांगली-मिरज रस्त्याकडेला पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्र तसेच आष्टा-इस्लामपूरला पाईपद्वारे गॅस मिळेल. सांगली, साताऱ्याला भारत गॅस आणि कोल्हापूर जिल्ह्याला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी गॅस पुरवणार आहे. हा गॅस एलपीजीपेक्षा १० ते ४० टक्के स्वस्त व अत्यंत सुरक्षितही आहे.

ठळक मुद्देसांगली शहरात घरगुती गॅस पाईपलाईन कामास सुरुवात एलपीजीपेक्षा १० ते ४० टक्के स्वस्त, अत्यंत सुरक्षित गॅस

संतोष भिसे सांगली : जिल्ह्याला पाईपद्वारे गॅस पुरवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सांगली-मिरज रस्त्याकडेला पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्र तसेच आष्टा-इस्लामपूरला पाईपद्वारे गॅस मिळेल. सांगली, साताऱ्याला भारत गॅस आणि कोल्हापूर जिल्ह्याला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी गॅस पुरवणार आहे. हा गॅस एलपीजीपेक्षा १० ते ४० टक्के स्वस्त व अत्यंत सुरक्षितही आहे.गेल (गॅस अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) कंपनीने सांगली व कोल्हापूरसाठी या दोन कंपन्या प्राधिकृत केल्या आहेत. पाईप अ‍ॅण्ड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाकडून नियंत्रण ठेवले जात आहे. दाभोळ बंदराजवळून दाभोळ-बेंगळुरू ही गेलची गॅस पाईपलाईन पुणे-बेंगळुरू महामार्गाजवळून गेली आहे. त्या पाईपलाईनला वाघवाडी फाट्यापासून सांगलीसाठी जोड दिला जाईल.

पेठ, इस्लामपूर, आष्टा व वाळवा शहरांना कव्हर करत सांगलीला येईल. महापालिका क्षेत्रात मागणीनुसार पुरवला जाईल. प्रत्येक कनेक्शनचे बिलिंग स्वतंत्र मीटरद्वारे निश्चित होईल. मीटर रिडिंग कर्मचाऱ्यांकडून तसेच डिजिटल स्वरुपातही होईल.भारत गॅसने महापालिका क्षेत्रासह आष्टा, इस्लामपूर व वाळवा शहरातील लाभार्थी कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता असणाऱ्या घरांना गॅस मिळणार नाही, तो पक्क्या घरांनाच मिळेल. पारंपरिक सिलिंडरमध्ये द्रवरूप प्रोपेन व ब्युटेन असतो.

हवेपेक्षा जड असल्याने तो खालीच राहतो व स्फोटाचा धोका बळावतो. पाईपमधील गॅस मिथेन स्वरुपात व हवेपेक्षा हलका असतो. गळतीवेळी हवेत मिसळून जातो, त्यामुळे स्फोटाची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे सिलिंडरपेक्षा पाईपमधील गॅस सुरक्षित आहे. मेट्रो शहरांत सध्या तो घरोघरी मिळतो़, पण तेथे स्फोटाच्या घटना अत्यल्प आहेत. विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीपेक्षा दहा ते चाळीस टक्क्यांनी स्वस्त गॅस पाईपमधून मिळेल.

हेर्ले (जि. कोल्हापूर) येथील गेल कंपनीच्या गॅस स्टेशनमधून एक लाईन सांगलीसाठी व दुसरी साताऱ्यासाठी निघेल. सांगली-मिरज रस्त्यावर सध्या जमिनीखाली दीड मीटर खोलीवर पाईप पुरली जात आहे. गळती अजिबात होऊ नये यासाठी अत्यंत उच्च प्रतीच्या स्टीलची पाईप वापरली जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका