शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

श्वानदंशाने १२ जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:27 IST

शेगाव : आवंढी (ता. जत) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने १२ जनावरे दगावली. यात शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे ...

शेगाव : आवंढी (ता. जत) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने १२ जनावरे दगावली. यात शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी कळवूनही वेळेत रेबिजची लस दिली नसल्याने या जनावरांचा मुत्यू झाला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

आवंढीत गेल्या आठवड्यात काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला होता. या कुत्र्यांनी गावातील एक बैल, पाच गायी, त्यांची चार लहान पिले व दोन म्हसींचा चावा घेतला. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आवंढी पशुवैद्यकीय डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. मात्र वेळेत उपचार झाले नाहीत. आणखीनही जनावरांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांनाही रेबिज झाल्याचा संशय आहे. त्यांना वेळेत उपचार न मिळाल्यास तीही दगावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चाैकट

नुकसानभरपाईची मागणी

शासनाने लाखो रुपये खर्चून आवंढी येथे श्रेणी १ दर्जाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाची प्रशस्त इमारत बांधली आहे; मात्र येथे कायमस्वरूपी डॉक्टर मिळालेला नाही. कित्येक वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे कारभार देण्यात आला आहे. परिणामी वेळेत उपचार होत नसल्याने डोळ्यादेखत मृत्यू होताना पाहावे लागत आहे. या प्रकाराची चौकशी करून संबधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.