शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या मदतीला धावले काॅलेजचे डाॅक्टर, विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

फोटो ओळी : महापालिका क्षेत्रातील होमआयसोलेशनमधील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्यावतीने डाॅक्टर, नर्सेसचे पथक कार्यरत करण्यात आले. यावेळी ...

फोटो ओळी : महापालिका क्षेत्रातील होमआयसोलेशनमधील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्यावतीने डाॅक्टर, नर्सेसचे पथक कार्यरत करण्यात आले. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, पृथ्वीराज पाटील, अभिजित भोसले, शीतल धनवडे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रातील होमयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवरील उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वीराज पाटील फौंडेशन धावून आले आहे. या फौंडेशनने गुलाबराव पाटील होमिओपॅथी महाविद्यालयातचे डाॅक्टर, शिकावू विद्यार्थी आणि नर्सेस असे ६१ जणांचे पथक शुक्रवारपासून महापालिकेच्या मदतीसाठी कार्यरत झाले.

महापालिकेच्या हनुमाननगर येथील आरोग्य केंद्रात या उपक्रमाचा प्रारंभ काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी स्थानिक नगरसेवक अभिजित भोसले, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. पृथ्वीराज धनवडे, डॉ. शीतल धनवडे उपस्थित होते.

यावेळी आयुक्त कापडणीस म्हणाले, महापालिका क्षेत्रात दीड हजारहून अधिक रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत. या रुग्णांची काळती व नियमांचे पालन होते की नाही, यावर आशा वर्कर लक्ष ठेवत आहेत. एका प्रभागात १५० हून अधिक रुग्ण असल्याने आशा वर्कर्सवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील फौंडेशन आणि स्व. गुलाबराव पाटील होमिओपॅथी कॉलेजकडून होमयसोलेशनसाठी त्यांचे डॉक्टर, नर्सेस तसेच शिकावू विद्यार्थी हे महापालिकेच्या मदतीसाठी पाठविले आहेत. यामुळे होमआयसोलेशन असलेल्या प्रत्येक रुग्णांवर दैनंदिन लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, प्रत्येक प्रभागात दोन डॉक्टर, दोन नर्सेस आणि अन्य स्टाफ यांच्याकडून गृहभेटी देऊन होमआयसोलेशनमधील व्यक्तीची काळजी घेतील. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून त्याचा चार्ट ठेवला जाईल. शिवाय कॉल सेंटरमधून त्यांना दिवसातून तीन वेळा कॉल करून माहिती घेतली जाईल. २१ डॉक्टर आणि २० नर्सेस व अन्य असा ६१ जणांचा स्टाफ कार्यरत असणार आहे.

यावेळी डॉ. जिनेश्वर एलिगोडा, डॉ. सुहास पाटील, डॉ. संतोष भोजगे, डॉ. प्रताप भोसले, नर्सिंग स्टाफ शैलेंद्र मालप, सोनिया भोरे, प्रफुला आवळे, तृप्ती कुरणे, प्रतीक्षा लोखंडे, रोहिणी मोरे, आफ्रिन मंगळवारे, बिपिन कदम, आयुब पटेल, रविराज खराडे उपस्थित होते.