शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बोंबाळेवाडी येथे डॉक्टर, परिचारिकेला शिवीगाळ, दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:30 IST

सांगली : बोंबाळेवाडी (ता. कडेगाव) येथील उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ...

सांगली : बोंबाळेवाडी (ता. कडेगाव) येथील उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. उपसरपंचांनी डॉक्टर व परिचारिकेला दमदाटी केल्याप्रकरणी ही कारवाई केली जाणार आहे.

शाळगावमध्ये आरोग्य उपकेंद्राअंतर्गत बोंबाळेवाडी येथे दमदाटी व शिवीगाळीचा प्रकार घडला. एका कोरोना संशयित रुग्णाने आरटीपीसीआर चाचणीवेळी परिचारिका आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला दमदाटी केली. याची माहिती जिल्हा परिषदेला देण्यात आली. त्याची गंभीर दखल डुडी यांनी घेतली. ते म्हणाले की, संबंधितावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यासंदर्भात पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याशी चर्चा झाली आहे. समुदाय आरोग्य अधिकारी आणि परिचारिका कोरोना चाचण्यांसाठी गावात गेले होते. तपासणीदरम्यान एका ग्रामस्थाची रॅपिड अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे चाचणीवर त्याने संशय घेतला. कर्मचाऱ्यांशी वाद घातला. मी निगेटिव्ह असून आरटीपीसीआर चाचणी केलीच पाहिजे, असा दबाव आणला. कर्मचाऱ्यांनी त्याला नकार दिल्यानंतर शिवीगाळ केली. यादरम्यान तेथील उपसरपंचांनी कर्मचाऱ्यांना अश्‍लील शिवीगाळ केली. दमबाजी केली. तशी तक्रार कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेेकडे केली आहे.

डुडी म्हणाले की, या घटनेेने कर्मचारी दबावाखाली आले आहेत. गावात सहकार्य होत नसेल आणि दमदाटी केली जात असेल तर तेथे काम करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा झटून काम करत असताना उपसरपंचासारख्या जबाबदार व्यक्तीने दमदाटी करणे गंभीर आहे. त्याची गय केली जाणार नाही. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. त्यांना सहकार्य करण्याऐवजी धमकी देणे योग्य नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. उपसरपंचासह या प्रकरणात नाहक तपासणीसाठी दबाव आणणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल केला जाईल. कर्मचाऱ्यांना कोणी त्रास देत असेल तर त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे. आम्ही तत्काळ गुन्हा दाखल करू. लोकांनीही सहकार्य करायला हवे.