शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे नव्हे, आता हवेचे बिल पालिकेला द्यायचे का?

By admin | Updated: December 16, 2014 00:17 IST

नागरिकांचा सवाल : २४ तास योजनेच्या ठेकेदाराचे बिल अडविले

सांगली : महापालिकेच्या चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना भरमसाठ बिले आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाण्यासोबतच हवेचेही मीटर रिडिंंग होत असल्याने बिले वाढली असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. याबाबत पाणी मीटरची तपासणी करून रिडिंगबाबत खात्री झाल्याशिवाय ठेकेदाराचे बिल अदा न करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तत्कालीन विकास महाआघाडीने विश्रामबाग परिसरातील चार प्रभागात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची योजना २०१२ मध्ये हाती घेतली. हे काम ‘तत्त्व ग्लोबल’ या खासगी ठेकेदाराला देण्यात आले. या कंपनीकडून मीटर बसविणे, पाण्याची बिले देणे, वसुली आदी कामे केली जातात. गेल्या दोन वर्षात या योजनेतून विश्रामबाग परिसरातील तीन हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात दोनशेहून अधिक नागरिकांना जादा बिले येत आहेत, अशी तक्रार आहे. नळाला पाणी येण्यापूर्वी पाईपलाईनमधून हवा येते. त्या हवेवर मीटर जोरात फिरते, त्याचे रिडिंग होत असल्याने जादा बिले येत असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. यापूर्वीही काही नागरिकांनी अशाच तक्रारी केल्या होत्या. तेव्हा ठेकेदाराने एअरव्हॉल बसवून त्यांच्या तक्रारीचे निकारण केले. आता पुन्हा याच तक्रारी येऊ लागल्या आहेत. सध्या या नागरिकांना दीड ते दोन हजारपर्यंत पाण्याची बिले येत आहेत. ठेकेदाराचे दोन वर्षातील १८ लाखांचे बिल थकित आहे. याबाबत आज नगरसेविका मृणाल पाटील यांनी आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांच्या दालनात उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, मृणाल पाटील व ‘तत्त्व ग्लोबल’चे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी हवेचे रिडिंग होत नसल्याचे कंपनीने सिद्ध करावे, मगच बिले अदा केली जातील, असे स्पष्टपणे सांगितले. ठेकेदारानेही या मीटरची तपासणी करून शंकांचे निरसन करण्याची ग्वाही दिली आहे. (प्रतिनिधी)