शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरहो, लातूरचे पाणी बंद करू नका

By admin | Updated: April 23, 2016 00:55 IST

रावसाहेब दानवे : तासगावात शिवरायांच्या पुतळा चबुतऱ्याचे भूमिपूजन; ‘टेंभू’साठी निधी देणार

तासगाव : छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहिल्यावर त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण होते. त्यांच्या कामापासून प्रेरणा मिळते. पुतळा उभारण्याबाबत पूर्वीच्या शासनाचे जाचक नियम होते. मात्र आता प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचा पुतळा उभारला जात असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. सांगली जिल्ह्याने लातूरला पाणी देऊन पाण्याचे ओझे कमी केले. टेंभूच्या पाचव्या टप्प्यासाठी आणखी पैसे देऊ, मात्र लातूरचे पाणी बंद करू नका, असेही ते म्हणाले. येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळा चबुतऱ्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्याहस्ते पुतळा चबुतऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले, शिवरायांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यांच्या कामाचे स्मरण होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात पुतळे उभारले जात आहेत. इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अरबी समुद्रातदेखील महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळाचे सावट आहे. कमी पावसाच्या ठिकाणी दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्राकडूनही कधी नव्हे इतकी ३२०० कोटी रुपयांची मदत राज्याला देण्यात आली आहे. राज्यातील अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. ‘टेंभू’चा प्रकल्प पैशाअभावी थांबला आहे. त्यासाठी पैसे उपलब्ध करुन दिले. सांगली जिल्ह्याने लातूरला पाणी देऊन पाण्याचे ओझे कमी केले. रेल्वेमुळे मराठवाड्याला पाणी मिळाले. टेंभूच्या पाचव्या टप्प्यासाठी आणखी पैसे देऊ, मात्र लातूरचे पाणी बंद करू नका. भाजपच्या सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. ते कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन सांगायला हवेत.खासदार पाटील म्हणाले की, शहरात महाराजांचा अश्वारुढ पुतळा असावा, अशी लोकांची अनेक वर्षापासून मागणी होत होती. हा पुतळा लवकरात लवकर उभारला जाईल. या पुतळ्यासाठी लोकवर्गणीही मिळणार असून, अशाच पध्दतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही उभारण्यात येईल. नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. (वार्ताहर)