शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवरील राग व्यक्त करण्याची संधी सोडू नका

By admin | Updated: January 6, 2017 00:19 IST

धनंजय मुंडे : कामेरीत विविध विकास कामांचे उद्घाटन

कामेरी : नोटाबंदी व शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा कवडीमोल दर याबाबत केंद्र व राज्य सरकारवरील राग व्यक्त करण्याची चांगली संधी, येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे. सरकारचा निषेध नोंदवत राष्ट्रवादीला मतदान करा, असे आवाहन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी येथे केले. कामेरी (ता. वाळवा) येथे कामेरी ग्रामसचिवालय, जलशुध्दीकरण केंद्र, जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचे भूमिपूजन आणि पाणीपुरवठा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. जयंत पाटील होते.मुंडे म्हणाले की, ऊस दरासाठी यापूर्वी बारामतीला जाऊन आंदोलन करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी नाही, तर स्वत:च्या स्वार्थासाठी आंदोलने केली. एक खासदार व दुसरा मंत्री झाला. नंतर त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ केला आहे. यापुढील काळात त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. ऊस, कापूस, सोयाबीन, भाजीपाला यापैकी कशालाही दर नाही. त्यांना साथ देणाऱ्या शेतकरी संघटना गप्प आहेत. मंत्रिमंडळात एक-दोन मंत्र्यांचा अपवाद वगळता शेतकऱ्यांची बाजू घेणारा कोणी नाही. भ्रष्टाचार व काळा पैसा शोधण्यासाठी नोटाबंदी केली, असे सांगणारे भाजपवाले आता त्यावर काहीच बोलत नाहीत. आता भारत कॅशलेस करायचा आहे, असे म्हणतात. केंद्र व राज्य सरकारवरील राग व्यक्त करण्याची चांगली संधी निवडणुकीच्या माध्यमातून आता आली आहे. यावेळी जि. प. अध्यक्षा स्नेहल पाटील, भाऊसाहेब पाटील, वाळवा पं. स. सभापती रवींद्र बर्डे, देवराज पाटील, नंदू पाटील, जगदीश पाटील, सुनील पाटील, छाया पाटील दिलीप पाटील उपस्थित होते. रणजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र पाटील व पोपट कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच अशोक कुंभार यांनी आभार मानले. (वार्ताहर)