भोसेत दारू पार्टीसाठी मित्रांसोबत गेलेल्या दत्तात्रय झांबरे याने सिगारेट आणण्यासाठी उशीर झाल्याबद्दल सागर सावंत व अमोल खामकर या दोघांना शिवीगाळ केली. यावेळी दोघांनी दत्तात्रय याच्यावर कोयत्याने वार करत खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खामकर वस्तीजवळ शेतातील बंद कूपनलिकेत टाकले. सावंत व खामकर या दोघांनी दत्तात्रय याच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांनी कूपनलिकेतून बाहेर काढण्यात पोलिसांनी यश मिळाले आहे. कूपनलिकेतून बाहेर काढलेले तुकडे मानवाचेच आहेत याची तपासणी करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे तुकडे मृत दत्तात्रय याचेच असल्याची खात्री करण्यासाठी डीएनए तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कूपनलिकेतून काढलेल्या तुकड्यांपैकी काही तुकडे दत्तात्रय याच्या कुटुंबाकडे अंत्यविधीसाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भोसेतील तरुणाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची डीएनए तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:31 IST