शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी सात जोडप्यांची ‘डीएनए’ तपासणी

By admin | Updated: April 5, 2017 00:36 IST

म्हैसाळ गर्भपात प्रकरण; अहवालाची प्रतीक्षा

सांगली/मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्येच्या प्रकरणात मुलीचा गर्भ आहे म्हणून डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या आणखी सात जोडप्यांचे ‘डीएनए’ तपासणीसाठी पोलिसांनी नमुने घेतले आहेत. यामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जोडप्यांचा समावेश आहे. यापूर्वीही सात जोडप्यांचा शोध घेऊन ‘डीएनए’ तपासणी केली आहे. पण अजूनही त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. आतापर्यंत १४ जोडपी शोधून काढण्यात यश आले आहे. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर खिद्रापुरेचे भ्रूणहत्येचे ‘रॅकेट’ उघडकीस आले होते. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळ येथे ओढ्यालगत पुरले होते. जेसीबीने खुदाई केल्यानंतर तब्बल १९ भ्रूण सापडले होते. या भ्रूणांचे अवशेष ‘डीएनए’साठी यापूर्वीच पाठविले आहेत. पण ज्या महिलांचे गर्भपात केले होते; त्यांचेच हे भ्रूण आहेत का, याचा तपास करणे महत्त्वाचे होते. यासाठी पोलिसांनी गर्भपात केलेल्या महिलांचा शोध सुरु ठेवला. गेल्या महिन्यात गर्भपात केलेल्या सात महिला व त्यांचे पती यांचा शोध घेतला होता. त्यांचे नमुने ‘डीएनए’ तपासणीसाठी पाठविले आहेत. पण अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. पोलिसांच्या शोधमोहिमेत गर्भपात केलेल्या आणखी सात महिला व त्यांचे पती यांचा शोध घेण्यात यश आले आहे. यामध्ये मालगाव (ता. मिरज), मोरगाव (ता. कवठेमहांकाळ), शहापूर (ता. हातकणंगले), करवीर (जि. कोल्हापूर), तेरवाड, गौरवाड (ता. शिरोळ) व शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील जोडप्यांचा समावेश आहे. त्यांचे नमुने ‘डीएनए’ तपासणीसाठी घेतले आहेत. पोटात वाढत असलेला गर्भ मुलीचा असल्याचे गर्भलिंग निदान तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर, अनेक महिला पतीच्या मदतीने खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपात करण्यास येत असत. आतापर्यंत खिद्रापुरेने अनेक गर्भपात केल्याची माहिती पुढे येत असल्याने, त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावा गोळा करण्यासाठी, गर्भपात केलेल्या महिलांचा व त्यांच्या पतींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरु ठेवले होते. यामध्ये त्यांना यशही आले आहे. आतापर्यंत जोडप्यांना ‘डीएनए’ तपासणीसाठी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आहे. त्यांनीही गर्भपात केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. त्यांच्या नावाबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली असल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. (प्रतिनिधी)