शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

डीएनएचा अहवाल पोलिसांच्या हाती

By admin | Updated: April 26, 2017 23:47 IST

दीपाली काळे : तपास अंतिम टप्प्यात

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्येच्या प्रकरणात, मुलीचा गर्भ आहे म्हणून डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या आठ जोडप्यांचे नमुने ‘डीएनए’ तपासणीसाठी पोलिसांनी घेतले होते. त्यांचा अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे. यामध्ये स्त्री व पुरूष अशा दोन्ही गर्भांची हत्या करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असल्याचे पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी बुधवारी सांगितले. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर खिद्रापुरेचे भ्रूणहत्येचे ‘रॅकेट’ उघडकीस आले होते. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळ येथे ओढ्यालगतच पुरले होते. जेसीबीने खुदाई केल्यानंतर तब्बल १९ भ्रूण सापडले होते. या भ्रूणांचे अवशेष ‘डीएनए’ तपासणीसाठी यापूर्वीच पाठविले आहेत. पण ज्या महिलांचे गर्भपात केले होते; त्यांचेच हे भ्रूण आहेत का, याचा तपास करणे महत्त्वाचे होते. यासाठी पोलिसांनी गर्भपात केलेल्या महिलांचा शोध सुरू ठेवला आहे. गेल्या महिन्यात गर्भपात केलेल्या सात महिला व त्यांचे पती यांचा शोध घेतला होता. त्यांचे नमुने ‘डीएनए’ तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्याच्याकडे आॅपरेशन थिएटर चालविण्याचा परवाना होता, पण नर्सिंगचा परवाना नव्हता. त्यामुळे तो कसा काय उपचार करीत होता, याची चौकशी सुरू आहे. तपास अंतिम टप्प्यात आला असून या प्रकरणात आणखी काही डॉक्टरांचा समावेश आहे का, याचाही शोध सुरू आहे, असेही डॉ. काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)निंबाळकर नियुक्तखिद्रापुरे याच्याकडून केवळ स्त्री गर्भाचीच नव्हे, तर पुरूष गर्भाचीही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून पुण्याचे अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ. दीपाली काळे यांनी सांगितले.