शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

आली माझ्या घरी ही दिवाळी...

By admin | Updated: November 9, 2015 23:23 IST

जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण : खरेदीसाठी सांगलीच्या बाजारपेठांमध्ये दिवसभर गर्दी; मोठी उलाढाल

सांगली : ‘प्रकाश आणि मांगल्याचा उत्सव’ म्हणून ओळख असलेल्या दिवाळीची आज, मंगळवारपासून खऱ्याअर्थाने सुरुवात होत असून, सोमवारीही बाजारपेठेतील उत्साह कायम होता. दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, लक्ष्मीपूजेसाठी लागणाऱ्या फळांच्या आणि फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत होती. तसेच ज्या चाकरमान्यांचा पगार, बोनस झाला आहे, त्यांच्या दिवाळीस सोमवारपासूनच सुरुवात झाली. दरम्यान, व्यापारी वर्गाकडून रोजमेळाच्या हिशेबाच्या वह्या खरेदीसाठीही बाजारात गर्दी होती. मंगळवारी नरकचतुर्दशीच्या निमित्ताने या दिवाळीतील पहिले अभ्यंगस्नान होत आहे. दिवाळीची खरी सुरुवात नरकचतुर्दशीपासून होते. मात्र बाजारपेठेत फेरफटका मारला असता, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली खरेदीसाठीची गर्दी आजही कायम होती. कपड्यांच्या खरेदीबरोबरच पाडव्यादिवशीची वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी निश्चित करण्याकडे ग्राहकांचा ओढा होता. सोमवारी धनत्रयोदशीला व्यापारी वर्गाकडून वर्षभरासाठी लागणाऱ्या हिशेबाच्या वह्या खरेदीसाठी शहरातील गणपती पेठ व कापड पेठेतील वही विक्रेत्यांकडे गर्दी दिसून येत होती. यंदा वह्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असली तरी, त्याचा कोणताही परिणाम खरेदीवर दिसून आला नाही. पारंपरिक बायडिंगच्या वह्या खरेदीसाठी व्यापारीवर्गाने प्राधान्य दिले. वसुबारसपासून दिवाळीस सुरुवात झाली असली तरी, दिवाळीचा खरा उत्साह हा मंगळवारपासूनच सुरु होणार आहे. शाळांसह शासकीय कार्यालयांना सुरु असलेल्या सलग सुट्ट्यांमुळे दिवाळीच्या आनंदात भर पडली आहे. नरकचतुर्दशीनंतर लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे सलग सण असल्याने, खरेदीसाठी आज एकच दिवस होता. त्यामुळे बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. मंगळवारच्या पहिल्या अभ्यंगस्नानासाठी सुगंधी उटणे, साबण आणि सुगंधी तेलांची चांगली विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.नरकचतुर्दशीला व लक्ष्मीपूजनाला फुलांचे आणि फळांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने पूजेसाठी फळांच्या खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिले. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांची आवक सोमवारपासून सुरू झाली असली तरी, मागणी कमी होती. मंगळवार सायंकाळपासून फुलांना मागणी वाढणार आहे. फटाक्यांच्या खरेदीसाठीही गर्दी होत असून यावेळी प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच फटाक्यांची विक्री करावयाची असल्याने, ग्राहकांना फटाके स्टॉल शोधताना कसरत करावी लागत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला गावी जाण्यासाठी बसस्थानकावर गर्दी होती. गर्दी वाढल्याने गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. एसटीतर्फे गर्दीनुसार जादा बसेसची सोय केल्याने प्रवाशांना थोडाफार दिलासा मिळाला. साऱ्या सणांत ‘लय भारी’ सण असणाऱ्या दिवाळीची तयारी पूर्ण झाल्याने दीपोत्सवास मंगळवारपासून सुरुवात होत आहे. (प्रतिनिधी)प्रदूषणमुक्त दिवाळी : सामाजिक संस्थांचा जागर एकीकडे दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, मंगळवारपासून फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीने आसमंत उजळून निघणार असला तरी, प्रदूषणाची चिंता ही आहेच. आतषबाजीनंतर निर्माण होणारा फटाक्यांचा कचराही वाढत असल्याने, शहरातील काही सामाजिक संस्थांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी पुढाकार घेत प्रबोधन चालविले आहे. फटाके फोडताना काळजी ही हवीच...दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करताना आवश्यक ती काळजी घ्यावी. आतषबाजी करीत असताना लहान मुलांबरोबर घरातील ज्येष्ठांनी थांबणे गरजेचे आहे. लहान मुलांना फटाके हाताळण्यास देऊ नयेत. मोठ्या आवाजाचे अथवा धोकादायक फटाके फोडणे टाळण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. दिवाळी शुभेच्छांनी मोबाईल फुल्लकाही वर्षांपर्यंत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटकार्डाचा सर्रास वापर होत असे. विविध संदेश असलेल्या भेटकार्डांना मागणीही होती. मात्र आजच्या स्मार्ट फोनच्या जमान्यात शुभेच्छा देण्यासाठी व्हॉटस्-अ‍ॅपचा वापर जोरात सुरू आहे. त्यामुळेच अनेकांनी व्हॉटस्-अ‍ॅपद्वारे शुभेच्छा देण्यासच प्राधान्य दिले आहे. आज नरकचतुर्दशीनरकचतुर्दशीदिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, अशी अख्यायिका आहे. नरकासूर वधाच्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.