शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात झेंडू उत्पादकांची दसऱ्याला झाली ‘दिवाळी’

By admin | Updated: October 25, 2015 00:46 IST

खुशीचे वातावरण : जोरदार मागणीसह समाधानकारक दर

शरद जाधव, सांगली : दसरा, दिवाळी सणातील पूजा आणि सजावटीचा अविभाज्य भाग असलेल्या झेंडूने उत्पादकांना यंदा चांगलीच साथ दिली आहे. जोरदार मागणीसह झेंडूचे दर प्रतिकिलो १६० रुपयांपर्यंत पोहोचल्याने उत्पादकांनी दसऱ्यादिवशीच ‘दिवाळी’ साजरी केली. मुंबई, पनवेल, पुणे, कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत सांगली परिसरातील फुलांना नेहमीच मोठी मागणी असते. त्यामुळे बाराही महिने फुलांचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. आता दसरा, दिवाळीसारख्या मोठ्या सणालाच नव्हे तर इतर वेळीही सजावटीसाठी फुलांचा वापर वाढला आहे. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीमुळे यंदा फुलाचे उत्पादन कमी झाले आहे. मात्र दसऱ्यादिवशी झेंडूला घाऊक बाजारात ५० ते ६० तर किरकोळ बाजारात १५० ते १६० रुपयांपर्यंत दर मिळाला. बहुतांश उत्पादक दसरा आणि दिवाळी सण समोर ठेवून झेंडूचे उत्पादन घेत असतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून उत्पादन खर्चही पदरात पडत नसल्याने उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला होता. यंदा मात्र दसरा सणाला चांगला दर मिळाल्याने उत्पादक खुशीत आहेत. फुलांच्या किमती वाढल्याने हारांच्या किमतीतही वाढ दिसून आली. सांगलीच्या बाजारपेठेत दसऱ्याअगोदर २५ ते ३५ रुपयांना मिळणाऱ्या हाराची किंमत दसऱ्यादिवशी ८० ते ११० रुपयांपर्यंत पोहोचली होती; तर तोरणाची पाचशे रुपयांपासून दीड हजारापर्यंत विक्री झाल्याचे हार विक्रेत्यांनी सांगितले. टंचाई परिस्थितीमुळे उत्पादन कमी झाल्याने दिवाळीलाही झेंडूचा दर असाच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दिवाळीनंतर येणाऱ्या मालालाही चांगला दर मिळण्याची अपेक्षा असल्याने गेल्या काही वर्षात प्रथमच झेंडू उत्पादकांनी ‘अच्छे दिन’ अनुभवले आहेत. इतर फुलांनाही दरवाढीचा ‘सुगंध’ दसऱ्याला झेंडूबरोबरच इतर फुलांनाही चांगली मागणी होती. अपेक्षेपेक्षा फुलांचे उत्पादन कमी असल्याने व बाहेरच्या बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने उत्पादकांनी त्याच बाजारात माल पाठवल्याने स्थानिक बाजारात फुलांची कमी आवक झाली. त्यामुळे गलांडा, शेवंतीसह इतर फुलांचीही चढ्या दरानेच विक्री झाली. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने फुलांच्या उत्पादनाकडे कमी ओढा दिसून आला. यामुळेच चांगला दर मिळाल्याची शक्यता उत्पादकांनी व्यक्त केली. दिवाळीला फुलांची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दर गेल्या तीन वर्षांपासून मागणी चांगली असतानाही झेंडू उत्पादकांना केवळ खर्च भागविण्यापुरता दर मिळत होता. ठेकेदारांची साखळी आणि जादा उत्पादनामुळे दर घसरत चालला होता. यंदा मात्र दसरा सणाला किरकोळ विक्री १५० ते १६० रुपयांपर्यंत गेली, तर घाऊक बाजारात ४० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळाल्याने उत्पादकांना फायदा झाला. सणाच्या दोन दिवस अगोदर झेंडूला मागणी वाढल्याने फुलांची तोड करताना उत्पादकांची तारांबळ उडाली. दलालच झाले सर्वाधिक मालामाल झेंडू उत्पादकांना यंदा दसऱ्याने समाधानकारक फायदा मिळवून दिला असला, तरी मुंबईसह राज्यातील इतर बाजारपेठेत माल पाठविणाऱ्या उत्पादकांपेक्षा दलालांना जादा फायदा झाल्याचे दिसून आले. उत्पादकांना ४० रुपयांपर्यंत दर देऊन खरेदी केलेल्या झेंडूची ७० ते ८५ रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने दलालांनी विक्री केली. शिवाय उत्पादकांकडून १५ टक्के कमिशन मिळत असल्याने उत्पादकांपेक्षा दलालांचा फायदा झाल्याचे दिसून आले. उत्पादक स्वत: फुले घेऊन फूल मार्केटला जाऊ शकत नसल्यानेही याचा फायदा व्यापाऱ्यांनी उचलला.