ओळ : ग्रामनिधीतून दिव्यांगांच्या अर्थसहाय्याची यादी व धनादेश दिव्यांग प्रहार संघटनेचे झाकीर मुजावर यांच्याकडे सरपंच अनिता क्षीरसागर, उपसरपंच तुषार खांडेकर व ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला.
मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीने दिव्यांगांसाठी पाच टक्के राखीव असणारा १ लाख ३० हजार रुपयांचा आर्थिक सहाय्य निधी १३० दिव्यांगांना वाटप केला. हा निधी दिव्यांगांच्या थेट बँक खात्यावर वर्ग करण्यात आला.
ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे गांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार करवसुली सुरू केली आहे. कर वसुलीसाठी नळ कनेक्शन खंडित करण्याबरोबर कडक धोरण राबविल्याने कर वसुलीला गती आली आहे. कर वसुलीला यश आल्याने ग्रामविकास अधिकारी कोरे, सरपंच अनिता क्षीरसागर, उपसरपंच तुषार खांडेकर यांनी ग्रामनिधीतून दिव्यांगांचा पाच, मागासवर्गीयांचा पंधरा व महिला बालकल्याणसाठी देण्यात येणारा दहा टक्के अर्थसहाय्याचा विषय सोडविण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात दिव्यांगांना अर्थसहाय्य वाटपाने केली. मालगावात ४० टक्क्यावरील दिव्यांगांची संख्या १३० आहे. १ हजार रुपयाप्रमाणे त्यांच्या बँक खात्यावर १ लाख ३० हजार रुपयांचे अर्थसहाय्य वर्ग करण्यात आले. धनादेशाचे वाटप सरपंच अनिता क्षीरसागर, उपसरपंच तुषार खांडेकर, ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांच्याहस्ते करण्यात. आले. अजित भंडे, कपिल कबाडगे व रवींद्र क्षीरसागर,
प्रहार संघटनेचे अध्यक्ष झाकीर मुजावर, रमेश होनमोरे, आण्णा परीट उपस्थित होते.