शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज तालुक्याचे विभाजन बारगळले

By admin | Updated: October 21, 2016 01:32 IST

जिल्हा प्रशासनाची मागणी : सांगलीत अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव

 सदानंद औंधे ल्ल मिरज सांगली शहर व पश्चिम भागातील ३० गावांतील ग्रामस्थांना महसुली कामासाठी मिरजेऐवजी सांगलीत अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव आहे. मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्याच्या मागणीचा प्रस्ताव बारगळल्याने जिल्हा प्रशासनाने अप्पर तहसील कार्यालयाची मागणी केली आहे. प्रशासकीय सोयीसाठी बहुसंख्य ठिकाणी जिल्ह्याच्याच ठिकाणी तालुका प्रशासन आहे, मात्र सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण मिरज तालुक्यात आहे. ७२ गावे आणि सुमारे सात लाख लोकसंख्या असलेल्या मिरज तालुक्यात मिरज, सांगली व इस्लामपूर हे असे अडीच विधानसभा मतदारसंघ येतात. नदीकाठचा पश्चिम भाग व कर्नाटक सीमेवरील पूर्व भागापर्यंत मिरज तालुक्याची हद्द आहे. सांगली शहरातील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे, तर पश्चिम भागातील ३० गावांतील ग्रामस्थांना महसुली कामे व शासकीय, शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेले दाखले मिळविण्यासाठी मिरजेला यावे लागते. स्वतंत्र सांगली तालुका झाल्यास पश्चिम भागातील ग्रामस्थांची सोय होऊन व मिरज तहसील कार्यालयावरील ताण कमी होणार आहे. मिरज तालुक्यात आठ मंडल विभागातील सांगली, कसबे डिग्रज, बुधगाव, कवलापूर हे मंडल विभाग सांगली तालुक्यात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. विजयनगर येथे नवीन प्रशासकीय इमारतीत सांगली तालुका कार्यालय सुरू करण्यासाठी प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्याची निर्मिती करण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती व अन्य शासकीय तालुका कार्यालयांसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार असल्याने हा प्रस्ताव रखडला आहे. आ. सुरेश खाडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याचे उत्तर देण्यात आले होते. मात्र सत्ता बदलानंतरही सांगली तालुक्याच्या प्रस्तावाची शासनाने दखल घेतली नसल्याने स्वतंत्र तालुक्याचा प्रस्ताव बारगळल्याची चिन्हे असल्याने सांगलीसाठी अप्पर तहसील कार्यालयाची मागणी आहे. मात्र या नवीन प्रस्तावाबाबतही निर्णय प्रलंबित असल्याची माहिती मिळाली. सांगलीसह ३० गावे सोपविणारस्वतंत्र सांगली तालुक्याऐवजी सांगलीत अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावानुसार मिरज तहसीलदारांकडील कामाचा ताण कमी करून सांगलीसह पश्चिम भागातील ३० गावांतील महसुली कामे सांगली अप्पर तहसीलदारांकडे सोपविण्यात येणार आहेत. हवेली तालुक्यातील पिंपरी, चिंचवड या शहरांंसाठी अप्पर तहसीलदार आहेत.