शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:59 IST

सांगली : कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचे पाणी याच जिल्ह्यातील दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी शासनाने योजना आखली आहे. याबाबत जागतिक बँकेशी ...

सांगली : कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचे पाणी याच जिल्ह्यातील दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी शासनाने योजना आखली आहे. याबाबत जागतिक बँकेशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी यास तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगलीत महाजनादेश यात्रेवेळी दिली.सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकात सोमवारी सायंकाळी फडणवीस यांची सभा झाली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, नीता केळकर आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, महापुरात उद्भवलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही उपाययोजना करीत आहोत. भविष्यात महापूर आला, तर येथील विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा यंत्रणा बंद होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील निम्मा भाग महापुराने ग्रासलेला असताना निम्मा भाग दुष्काळाशी सामना करीत होता. जिल्ह्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने नवी योजना आखली आहे. पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी यापुढे धरणातून दुभाजक बोगदा काढण्यात येईल. त्यातून कालव्याद्वारे हे पाणी जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला देण्यात येईल. जागतिक बँक आणि आशियाई बँकेच्या प्रतिनिधींचे पथक सांगलीला पाठविले होते. त्यांनी पाहणी केली आहे. दुष्काळी भागाला महापुराचे पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव त्यांच्यासमोर सादर केला असून, त्यांनी त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. याची अंमलबजावणी होण्यास पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. लोकांचे पुनर्वसन करण्याबरोबरच पुराची तीव्रता कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करू.महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक निधी आम्ही दिला आहे. पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना, व्यापाऱ्यांनाही आम्ही मदत करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांचे ढोलवादनसांगलीच्या विजयनगर येथे धनगर समाजाच्यावतीने नगरसेविका सविता मदने, अप्सरा वायदंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. समाजाच्यावतीने त्यांना काठी आणि घोंगडे देण्यात आले. यावेळी धनगरी ढोलवादन करण्यात येत होते. मुख्यमंत्र्यांनीही गळ्यात ढोल अडकवून ढोलवादन केले.महायुतीचेच सरकार येणारराज्यात भाजप, शिवसेना व अन्य घटक पक्ष एकत्र येणार की नाही, याविषयी मुख्यमंत्री काहीतरी बोलणार, अशी अनेकांना अपेक्षा होती. भाषणाचा समारोप करताना फडणवीस यांनी, राज्यात महायुतीचेच सरकार येणार, असे स्पष्ट केले. भाषणादरम्यान त्यांनी कोठेही शिवसेनेचा उल्लेख केला नाही.