शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपाबद्दल जिल्ह्यात संभ्रम

By admin | Updated: June 4, 2017 01:16 IST

संघटनांमध्ये मतभिन्नता : दूध वाहतूक काही प्रमाणात सुरू; आजपासून सर्व संघांकडून पुरवठा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मुंबईतील बैठकीत संप मिटल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच आंदोलनकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. हे आंदोलन फसल्याचे सांगून शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने आता संपात सहभागी न होण्याचा निर्णय न घेतला, तर रघुनाथदादा पाटील आणि किसान सभेने संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, बंद, पुतळा दहन यासारखी आंदोलने शनिवारी दिवसभर सुरूच राहिली. आंदोलनकर्त्यांमध्ये शनिवारी दिवसभर संभ्रम दिसत होता. तरीही ठिकठिकाणी संपाची धग कायम राहिली. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, म्हैसाळमध्ये बंद पाळून शासनाचा निषेध करण्यात आला. लेंगरे (ता. खानापूर), येलूर (ता. वाळवा) येथील आठवडा बाजार झाले नाहीत, तर इस्लामपूरमध्ये बळिराजा संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ््याचे दहन केले. संपाची तीव्रता थोडी कमी झाल्याचे शनिवारी दिसून आले. काही दूध संघांनी शनिवारी सकाळी दूधपुरवठा सुरू ठेवला, तर बहुतांश खासगी संघांनी रविवारपासून पुरवठा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शनिवारी भाजी बाजारात थोडी गर्दी दिसत होती. शेतकरी संघटनांमध्येही आता संपावरून मतभिन्नता दिसत आहे. शरद जोशीप्रणित संघटनेने संपात यापुढे सहभागी न होता, नियोजन करून पुन्हा काही दिवसांनी आंदोलनात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे बळिराजा संघटना, किसान सभा यांनी आंदोलन कायम असल्याचे स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून हिंसक बनलेला संप शनिवारी थोडा शांत झाला होता. पश्चिम महाराष्ट्रात दोनच दिवसात मोठा संप झाला, ही जमेची बाजू आहे. तरीही नेतृत्व नसलेल्या संपात सहभागी होणे ही आमची चूक होती. मागण्यांबाबत चर्चा करण्याचा अनुभव संबंधित पुणतांब्याच्या लोकांना नव्हता. त्यामुळे सरकारने त्यांना फसविले. संपाबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. पुन्हा ते उभारणे शक्य नाही. त्यामुळे थोडे दिवस शांततेने चर्चा करून पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल. - संजय कोले, शेतकरी संघटना (शरद जोशीप्रणित)सरकारने संपकऱ्यांना फसविण्याचे काम केले आहे. एकही मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे संप चालू राहील. सोमवारी ५ जूनपासून जिल्"ात तीव्रता वाढविण्यात येईल. मुंबईत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील. - उमेश देशमुख, किसान सभा