शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पडसाद; बसेस फोडल्या

By admin | Updated: January 13, 2015 00:49 IST

सांगलीत रास्ता रोको : नांद्रे, इनामधामणी, कुमठेत बसेसवर दगडफेक

सांगली : उसाच्या किमान आधारभूत किमतीसाठी (एफआरपी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात केलेले आंदोलन व खासदार राजू शेट्टी यांना अटक केलेल्या कारवाईचे पडसाद आज, सोमवारी शहरात व नांद्रे (ता. मिरज) येथे उमटले. सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. नांद्रेत अज्ञातांनी दगडफेक करून दोन एस.टी. बस फोडल्या. या घटनेनंतर शहरासह, नांद्रे, वसगडे, आष्टा, इस्लामपूर व पलूसमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.एफआरपीसाठी स्वाभिमानीतर्फे आज पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन झाले. आंदोलनास हिंसक वळण लागल्याने कार्यालयावर दगडफेक झाली. याप्रकरणी खासदार शेट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईचे वृत्त शहरात येऊन धडकताच संघटनेचे कार्यकर्ते संतप्त बनले. शासनाचा निषेध करण्यासाठी लक्ष्मी फाट्यावर अचानक रास्ता रोको केला. तासभर झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलनात संघटनेचे मिरज तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष विनायक जाधव, बाबासाहेब ठोंबरे, जितेंद्र मिणचे, अण्णासाहेब बेले, राजेंद्र मगदूम, आदी सहभागी झाले होते.पलूसहून सांगलीकडे येणाऱ्या दोन एस.टी. (एमएच १० बीटी १०६६ व एमएच १२ सीएच ७८६१) बसना अज्ञातांनी लक्ष्य करून नांद्रेत दगडफेक केली. यामुळे चालकांनी एस.टी. थांबविली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस दाखल झाले. त्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या आठ एस.टी. बस नांद्रेतच थांबविण्यात आल्या. रात्री उशिरा या सर्व एस.टी. बस पोलीस बंदोबस्तात सांगलीच्या मुख्य बसस्थानकात आणण्यात आल्या. नांद्रेसह वसगडे (ता. मिरज) येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दगडफेकीत दोन्ही बसच्या काचा फुटून दहा हजारांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी नांद्रेत भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)कवठेएकंद येथे ‘क्रांती’चा फलक पेटविलाऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कवठेएकंद (ता. तासगाव) येथे काही आंदोलकांनी रात्री साडेसातच्या दरम्यान बसस्थानक चौकातील कुंडलच्या क्रांती साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयाचा फलक पेटविला. शिवाय रस्त्यावर टायर पेटविल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.