शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.४१%

By admin | Updated: June 13, 2017 23:42 IST

दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.४१%

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९२.४१ टक्के लागला. उत्तीर्णांमध्ये मुलींचे सर्वाधिक ९४.८६ टक्के प्रमाण असून गतवर्षीच्या तुलनेत ते चार टक्के अधिक आहे. बारावीनंतर दहावीमध्येही कडेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारत सर्वाधिक ९६.४७ टक्के निकालाची नोंद केली, तर सर्वात कमी निकाल जत तालुक्याचा ८९.१६ टक्के इतका लागला. जिल्ह्यातील १४४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. मागील पंधरा दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मंगळवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मागील काही वर्षांपासून बारावी आणि दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालातही कडेगाव तालुक्याने बाजी मारली. तालुक्याचा सर्वाधिक ९६.४७ टक्के निकाल लागला. जत तालुक्याचा निकाल ८९.१६, आटपाडी ९४.२८, कवठेमहांकाळ ९४.९६, खानापूर ९४.५६, मिरज ९१.३१, पलूस ९४.२६, सांगली शहर ९०.५७, शिराळा ९५.२७, तासगाव ९०.५३ आणि वाळवा तालुक्याचा निकाल ९३.७१ टक्के लागला. जिल्ह्यातील एक हजार ७३८ पुनर्परीक्षार्थींपैकी ५५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.१४४ शाळांचा शंभर टक्के निकालजिल्ह्यातील १४४ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात महापालिका हद्दीतील सर्वाधिक २२ शाळांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील १२, जतमधील १०, कडेगाव १३, कवठेमहांकाळ ९, खानापूर १६, मिरज १२, पलूस ९, शिराळा १६, तासगाव ६ आणि वाळवा तालुक्यातील १९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.२४ जूनला गुणपत्रिका हातीविद्यार्थ्यांना २४ जूनला संबंधित विद्यालयामध्ये गुणपत्रिका मिळणार आहे. तसेच १८ जुलैपासून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने कळविले आहे. दहावीचा निकाल लागल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारणत: २५ जूनपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. निकालाची टक्केवारी वाढली असल्याने प्रवेशासाठी चढाओढ होणार आहे.