शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. पेपरफुटीतील चौघेजण निलंबित

By admin | Updated: January 19, 2016 23:44 IST

सीईओंची कारवाई : खातेनिहाय चौकशी

सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका आणि औषध निर्माण अधिकारी पदाचे पेपर फोडण्यात सहभागी आढळून आल्याबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी बांधकाम विभागातील लिपिकासह आरोग्य विभागातील तीन आरोग्य सेवकांना निलंबित केले. या सर्व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांसाठी दोन महिन्यांपूर्वी लेखी परीक्षा झाली होती. पहिल्यादिवशी औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (महिला) या पदांसाठी परीक्षा होती़ शाहीन अजमुद्दीन जमादार या उमेदवाराने प्रश्नपत्रिका हातात पडण्यापूर्वीच उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली़ या प्रकरणानंतर आरोग्य सेविका परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण उजेडात आले. या चौकशीत जि. प. मुद्रणालयातील बायंडर रामदास फुलारे याने पेपर फोडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. अधिक चौकशीमध्ये फुलारे याने औषध निर्माण अधिकारी पदाचाही पेपर फोडल्याची कबुली दिली. पोलिसांच्या चौकशीमध्ये आणखी चौघे दोषी आढळून आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ सहायक किरण वसंतराव जाधव, कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक संजय गणपती कांबळे, भोसे आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक मंदार कोरे आणि आरोग्य सहायक शीतल मोगलखोडे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या अहवालानुसार या चौघांवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)