शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. जलव्यवस्थापन सभेला गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: December 10, 2014 23:47 IST

अध्यक्षांचे आदेश : आटपाडीत पाणी योजना मंजूर

सांगली : जलव्यवस्थापन समिती सभेस गैरहजर राहणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी दिले. सभेत आटपाडी येथील जुन्या नळपाणी पुरवठा योजनेच्या दीड कोटीच्या कामास मंजुरी देण्यात आली. आज, बुधवारी दुपारी जलव्यवस्थापन समितीची सभा होती. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभा सुरू झाल्यानंतरही सभेस नऊ गटविकास अधिकारी गैरहजर होते. याबाबत होर्तीकर यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली. गटविकास अधिकारी गैरहजर असल्याबद्दल सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. मिरजेचे गटविकास अधिकारी सभा सुरू झाल्यानंतर काही वेळाने उपस्थित झाले. परंतु वेळेत उपस्थित न राहणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना अध्यक्षांनी नोटीस देण्याचा निर्णय घेतला. सभेत आटपाडीसाठीच्या जुन्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी एक कोटी ४७ लाख रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली. सभेस जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, उज्ज्वला लांडगे, मनीषा पाटील आदींसह सदस्य, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)