शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

जि. प. देणार शिक्षकांना शिस्तीचे धडे

By admin | Updated: July 28, 2016 00:56 IST

शिक्षण समितीच्या बैठकीत निर्णय : सात शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यास मंजुरी

सांगली : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी दाढी केलेली असली पाहिजे, त्यांचा पोषाख नीटनेटका व सुस्थितीत असला पाहिजे. तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी एकच ड्रेस निश्चित करण्याचा निर्णय झाला. शाळेच्या परिसरात शिक्षकांनी गुटखा, मावा, तंबाखू सेवन करण्यावर बंदी घातली असून, तसे शिक्षक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शिक्षकांनी कशापध्दतीने टापटीप राहिले पाहिजे, याविषयी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन करावे, असाही निर्णय घेण्यात आला.उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. शिक्षण समितीची बैठक बुधवारी झाली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शिस्तबध्द राहिले पाहिजे. या शिक्षकांचेच विद्यार्थी अनुकरण करीत असतात. परंतु, अनेक शिक्षक दाढी कशीही ठेवतात. त्यांचे कपडे स्वच्छ नसल्याचेही दिसत आहे. काही शिक्षक गुटखा, मावा, तंबाखू खात असल्याचे दिसत आहे. या सर्वांचा लहान विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत आहे. यापुढे शिक्षकांनी शाळेमध्ये टापटीमध्येच आले पाहिजे. याबाबत शिक्षकांना अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी सदस्यांनी मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण समितीच्या बैठकीत तसा निर्णयही घेण्यात आला. तसेच जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांसाठी ड्रेस कोड निश्चित करण्याचाही निर्णय झाला. चौदाव्या वित्त आयोगातून गावांसाठी निधी मिळाला आहे. या निधीपैकी २५ टक्के निधी ग्रामपंचायतींनी शिक्षण, आरोग्य विभागावर खर्च केला पाहिजे. या निधीतून शाळांनी संरक्षण भिंत आदी मूलभूत सुविधांसाठी तो निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत.जत तालुक्यातील जालीहाळ बुद्रुक, ओलेकर वस्ती-खिलारवाडी, जिवान्नावार-साळुंखे वस्ती, सिंगनहळी येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिलीच्या वर्गामध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)