शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९०.७९ टक्के

By admin | Updated: May 31, 2017 00:17 IST

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९०.७९ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. सांगली जिल्ह्याचा निकाल ९०.७९ टक्के लागला असून, पुन्हा एकदा जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे सर्वाधिक ९५.७१ टक्के प्रमाण आहे. जिल्ह्यातील ३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेमध्ये गर्दी जमली होती. तसेच अनेकांनी मोबाईलवरून निकाल पाहिला. मंगळवारी बारावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यंदा नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारीत वाढ झाली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ३६ हजार ३४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३२ हजार ६७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ११ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रथम, तर १७ हजार ९५० विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात विज्ञान विभागाचा सर्वाधिक ९७.९१ टक्के लागला असून, कला शाखा ८०.७९, तर वाणिज्य ९४.६०, किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रमाचा ९०.१२ टक्के निकालाची नोंद झाली. गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत. यंदाही पुन्हा मुलींनी बाजी मारली. १५ हजार ४७१ मुलींपैकी १४ हजार ८०७ मुली उत्तीर्ण झाल्या असून, त्याचे प्रमाण ९५.७१ टक्के आहे. २० हजार ५१७ मुलांपैकी १७ हजार ८६७ जण उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.०८ टक्के आहे. जिल्ह्यातील ३० शाळांचा बारावी परीक्षेच्या निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यातही व्ही. आर. लोणारी गुरुकुल, आटपाडी, रॉयल मराठा निगडीखुर्द, सोपे ज्युनिअर कॉलेज, जत, अभिजित कदम, आमणापूर, बॉईज ज्युनि. कॉलेज, कवठेमहांकाळ, अंबाई मंडळ, कवठेमहांकाळ, जीवन प्रबोधिनी, गार्डी, एन. सी. बेळंकी, मिरज, नव कृष्णा व्हॅली, कुपवाड, रामानंद विद्यालय, पलूस, प्रतिनिधी ज्युनिअर, कुंडल, किर्लोस्कर हायस्कूल, किर्लोस्करवाडी, शंकर गुरुकुल, अभिजित कदम, पलूस, ए. ए. उपाध्ये गर्ल्स, कुपवाड, राजर्षी शाहू, सांगली, रजपूत ज्युनिअर, सांगली, कोठारी ज्युनिअर, सांगली, देशमुख ज्युनिअर, हुतात्मा नागनाथ ज्युनिअर, कमला जाधव ज्युनिअर, शिराळा, गुरुकुल दादोजी कोंडदेव, तासगाव, एस. एस. माने-पाटील विद्यामंदिर, विसापूर, अ‍ॅड. आर. आर. पाटील ज्युनिअर, विसापूर, कर्मवीर भाऊराव पाटील, वाळवा व नेर्ले, इस्लामपूर ज्युनिअर, इस्लामपूर, अण्णासाहेब डांगे ज्युनिअर, आष्टा यांचा समावेश आहे. जिल्ह्यात कडेगावचा दबदबाबारावीच्या निकालात जिल्ह्यात कडेगाव तालुक्याने बाजी मारली आहे. कडेगाव तालुक्याचा निकाल ९७.३४ टक्के, तर सर्वात कमी कवठेमहांकाळ तालुक्याचा ८६.८६ टक्के निकाल लागला. आटपाडी तालुका ९१.७४, जत ८७.२८, खानापूर ९५.५०, मिरज ९३.२९, पलूस ९४.६७, सांगली शहर ८८.६६, शिराळा ९२.९९, तासगाव ९४.६६ आणि वाळवा तालुक्याचा ८८.९६ टक्के निकाल लागला. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ३४.७२ टक्केजिल्ह्यातून एक हजार ३९७ पुनर्परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी ४८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकालाची टक्केवारी ३४.७२ इतकी आहे. चौदा विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ३३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.