शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत भाजीमंडईच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST

याबाबत ‘ मी मिरजकर’ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन खंदकातील शासकीय जागेवरील अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. मिरजेत भाजीमार्केटचे ...

याबाबत ‘ मी मिरजकर’ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन खंदकातील शासकीय जागेवरील अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. मिरजेत भाजीमार्केटचे काम रखडल्याने भाजीविक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना नवीन भाजीमार्केटचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात हायस्कूल रस्त्यालगत असलेल्या खंदकात भाजी मंडईची व्यवस्था करण्याची मागणी ‘मी मिरजकर’ फाउंडेशनने केली आहे. त्यानुसार महापालिका उपायुक्त स्मृती पाटील व तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी भाजीबाजारासाठी खंदकातील जागेची पाहणी केली. येथे तात्पुरती भाजी मंडई सुरू करण्यासाठी या जागेची स्वच्छत‍ा व सपाटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वीच काहीजणांनी या जागेच्या मालकीचा दावा करून रातोरात कुंपण घालून अतिक्रमण केले आहे.

याबाबत मी मिरजकर फाैंडेशनच्या तक्रारीनंतर तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी महापालिका उपायुक्तांना शासनाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या. उपायुक्त स्मृती पाटील यांनीही सहायक आयुक्तांना याबाबत आदेश दिले. जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चाैधरी यांचीही फाैंडेशनच्या सदस्यांनी भेट घेऊन याकडे लक्ष वेधले. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेस संबंधित जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले. यावेळी सुधाकर खाडे, महादेव कोरे, मनोहर कुरणे, उमेश कुरणे, नितीन सोनवणे, प्रशांत लोखंडे, सुधीर गोखले उपस्थित होते.