शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत पळापळ

By admin | Updated: March 22, 2017 23:36 IST

वसुली मोहीम गतीने : नोटाबंदीच्या फटक्यानंतरही जोश कायम, नफ्याचा विक्रम कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर

सांगली : नोटाबंदीच्या काळात लादले गेलेले निर्बंध आणि थकीत जुन्या नोटांवरील व्याजाचा फटका अशा प्रतिकूल परिस्थितीतही सांगली जिल्हा बॅँकेत उद्दिष्टपूर्तीचा जोश कायम राहिला आहे. मार्चचा शेवटचा आठवडाच हाती राहिल्याने बॅँकेत मोठ्या थकबाकींच्या वसुलीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेस मार्च २0१६ मध्ये ८३ कोटी ७२ लाखांचा ढोबळ नफा झाला होता. गत आर्थिक वर्षात बॅँकेने विक्रमी कामगिरी करीत आजवरचे नफ्याचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. २0१५ पर्यंत बॅँकेच्या २१७ पैकी २१६ शाखा नफ्यात होत्या. मुख्य कार्यालय तोट्यात होते. २0१६ मध्ये मुख्य कार्यालयसुद्धा नफ्यात आले. या सर्व कामगिरीस जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची मेहनत या गोष्टी कारणीभूत ठरल्या. नफ्याचा विक्रम कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडला. पगारवाढ, पदोन्नती अशा महत्त्वाच्या व प्रलंबित मागण्या मान्य झाल्या. त्याचवेळी बॅँकेच्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना २0१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता नफ्याचे शतक गाठण्याचे उद्दिष्ट दिले. गतवर्षाच्या नफ्याचा विचार करता यंदाचे उद्दिष्ट फारसे अवघड नव्हते, मात्र रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणांमुळे बॅँकेसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. नोटाबंदीच्या काळात ठप्प असलेले जिल्ह्यातील बॅँकेचे व्यवहार आणि ३१५ कोटींच्या जुन्या शिल्लक रकमेवरील व्याजाचा फटका या दोन गोष्टी सर्वात जास्त चिंतेच्या होत्या. या गोष्टींचा फटका उद्दिष्टपूर्तीला बसण्याची चिन्हेही दिसत आहेत. तरीही सर्व अडचणींचे बांध ओलांडून उद्दिष्टपूर्तीचा झेंडा फडकविण्यासाठी बॅँकेचे कर्मचारी राबत आहेत. बॅँकेच्या अध्यक्षांनीही वारंवार आढावा घेत वसुलीवर लक्ष ठेवले आहे. मोठ्या थकबाकीदारांकडे अडकलेल्या रकमा प्राधान्याने वसूल करण्यावर भर दिला आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाकडून येणे असलेल्या रकमांबाबतही लक्ष केंद्रित केले आहे. केलेल्या नियोजनाप्रमाणे मोहीम यशस्वी झाली, तर उद्दिष्टपूर्ती अवघड नसल्याचे अध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)