शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शनबाबत जिल्हा टंचाईच्या काठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

सांगली : कोरोना रुग्णांसाठी गरजेचे ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्याबाबतीत जिल्ह्याची स्थिती काठावरचीच आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत सुमारे १ हजार ४०० इंजेक्शन्स ...

सांगली : कोरोना रुग्णांसाठी गरजेचे ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्याबाबतीत जिल्ह्याची स्थिती काठावरचीच आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत सुमारे १ हजार ४०० इंजेक्शन्स उपलब्ध होती. जिल्ह्याची दररोजची गरज सरासरी ७५० इंजेक्शन्स इतकी आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दररोजच सरासरी १०० ने वाढत आहे. त्यातील गंभीर रुग्णांना रेमडेसिविर दिले जाते. मिरज कोविड रुग्णालयासह सर्व कोविड रुग्णालयांत दररोज सरासरी ७५० इंजेक्शन्स वापरली जातात. जिल्ह्याला विविध सहा कंपन्यांची इंजेक्शन्स पुण्याहून पुरविली जातात. साठा आणि वितरणावर अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण आहे. मिरज कोविड रुग्णालयाला थेट शासनाकडून पुरवठा होतो, तर अन्य रुग्णालयांसाठी कंपन्या पुरवतात. या सर्वांची नोंद अन्न व औषध प्रशासनाकडे होते.

या नोंदीनुसार मिरज कोविड रुग्णालयाकडे बुधवारी संध्याकाळपर्यंत ८८० इंजेक्शन्स उपलब्ध होती. अन्य कोविड रुग्णालयांमधील औषध दुकानांत ५५० इंजेक्शन्सचा साठा होता. गुरुवारी किंवा शुक्रवारपर्यंत हा साठा संपण्याची शक्यता आहे. नवा पुरवठा शुक्रवारी होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली. यदाकदाचित तो लांबला, तर मात्र आणीबाणीची स्थिती निर्माण होऊ शकते.

मंगळवारी पाडवा व बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सुट्यांमुळे रेमडेसिविरचा पुरवठा दोन दिवस होऊ शकला नाही, त्यामुळे टंचाईस्थिती निर्माण झाली. गुरुवारी जिल्ह्यातील सर्व कोेविड रुग्णालयांत इंजेक्शन उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. थेट औषध दुकानांमधून विक्रीस मनाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नितीन भांडारकर व निरीक्षक विकास पाटील वितरणावर नियंत्रण ठेवत आहेत.

कोट

रेमडेसिविरचा दोन दिवसांपुरता साठा उपलब्ध आहे. आणखी मागणी केली आहे. शुक्रवारी पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. सध्या तरी जिल्ह्यात कोठेही टंचाई नाही. सर्व कोविड रुग्णालयांत उपलब्ध आहेत.

- विकास पाटील, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन