शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेकडे

By admin | Updated: March 29, 2017 01:01 IST

नोटीस प्रसिद्ध : कामगारांसह अन्य देणी देण्याची जबाबदारीही बँकेवर

सांगली : कर्जाच्या थकीत ९0 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्हा बँकेने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा प्रतीकात्मक ताबा घेतला. यासंदर्भातील नोटीस बँकेने प्रसिद्ध केली असून, कारखान्याची देय असणारी ऊसबिले, कामगार देणी, शासकीय देणी देण्याची जबाबदारी बँकेने स्वीकारली आहे. जिल्हा बॅँकेने जानेवारी महिन्यात सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टनुसार कारखान्यास नोटीस बजावली होती. मार्चअखेर थकबाकीची रक्कम जमा केली नाही, तर एप्रिलमध्ये कारखान्याचा ताबा घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याची तयारी होती. मात्र कारखान्याने थकबाकी भरण्याबाबत कोणतीही हालचाल न केल्याने सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टनुसार जिल्हा बँकेने मंगळवारी कारखान्याचा ताबा घेतला. बँकेचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह सर्व संचालकांना नोटीस बजावली होती. यामध्ये थकबाकी ९0 कोटी ५५ लाख ४६ हजार इतकी दर्शविण्यात आली आहे. त्यावर १ जानेवारी २0१७ पासूनचे व्याजही आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मालमत्तेच्या संबंधाने कोणताही व्यवहार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पूर्वसंमतीखेरीज करू नये आणि तसा व्यवहार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही प्राधिकृत अधिकारी मानसिंग पाटील यांनी दिला आहे. जिल्हा बॅँकेला यंदा शंभर कोटी रुपयांच्या नफ्याचे उद्दिष्ट आहे. नोटाबंदीचा मोठा फटका बसल्याने उद्दिष्टपूर्ती कठीण ठरण्याची चिन्हे होती. तरीही बॅँकेचे अध्यक्ष आणि प्रशासनाने यातून मार्ग काढत चांगल्या वसुलीच्या दिशेने पावले टाकली आहेत. वसंतदादा कारखान्यासह माणगंगा सूतगिरणी, माणगंगा साखर कारखाना आणि माणगंगा गारमेंट या थकबाकीदारांना जिल्हा बँकेने नोटिसा बजावल्या आहेत. या चार संस्थांची थकबाकी दीडशे कोटींच्या घरात आहे. त्यामुळे ही वसुली झाली, तर जिल्हा बॅँकेचे यंदाचे शंभर कोटी नफ्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. त्यामुळे बॅँक प्रशासन आता सरसावले असून, कडक भूमिका स्वीकारली आहे.गतवर्षाच्या नफ्याचा विचार करता, यंदाचे उद्दिष्ट फारसे अवघड नव्हते. मात्र रिझर्व्ह बँकेच्या विचित्र धोरणामुळे बॅँकेसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. नोटाबंदीच्या काळात दोन ते तीन महिने ठप्प असलेले जिल्ह्यातील बॅँकेचे व्यवहार आणि ३१५ कोटींच्या जुन्या शिल्लक रकमेवरील व्याजाचा फटका, या दोन गोष्टी सर्वांत जास्त चिंतेच्या होत्या. (प्रतिनिधी)स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यातकारखान्याची सर्व प्रकारची स्थावर व जंगम मालमत्ता जिल्हा बॅँकेने ताब्यात घेतली आहे. जंगम मालमत्तेत केन हॅँडलिंग अ‍ॅन्ड फिडिंग विभाग, मिल हाऊस, क्लोरिफिकेशन, वर्कशॉप, डिस्टिलरी, कंट्री लिकर, पॉवर हाऊस अशा बारा विभागांचा समावेश आहे.