शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’ची निविदा जिल्हा बँक काढणार!

By admin | Updated: March 26, 2017 23:37 IST

थकबाकीपोटी घेणार कारखान्याचा ताबा; संचालक मंडळाच्या बैठकीत आज निर्णय शक्य

सांगली : थकीत ८५ कोटींच्या कर्ज वसुलीपोटी जिल्हा बँकेमार्फत वसंतदादा साखर कारखान्याचा ताबा घेण्यात येणार आहे. भाडेतत्त्वावर हा कारखाना चालविण्यास देण्याची निविदाही बँकेमार्फत काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. आज, सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बॅँकेने वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. गेल्या वर्षीही वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्यास जप्तीची नोटीस बजावली होती. त्यामुळे मार्चअखेरीस कारखान्याने ६२ कोटी रुपयांची थकबाकी जमा करून त्यांचे खाते नियमित केले होते. यावेळी पुन्हा सुमारे ८५ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या. नोटिसांना प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा बॅँकेने जानेवारी महिन्यात सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टनुसार त्यांना नोटीस बजावली आहे. ३१ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम जमा केली नाही, तर एप्रिलमध्ये कारखान्याचा ताबा घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची प्रक्रिया जिल्हा बॅँक राबवू शकते. त्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असून, बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवारी याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हा बॅँकेला यंदा शंभर कोटी रुपयांच्या नफ्याचे उद्दिष्ट आहे. नोटाबंदीचा मोठा फटका बसल्याने उद्दिष्टपूर्ती कठीण ठरण्याची चिन्हे होती. तरीही बॅँकेचे अध्यक्ष आणि प्रशासनाने यातून मार्ग काढत चांगल्या वसुलीच्या दिशेने पावले टाकली आहेत. वसंतदादा कारखान्यासह माणगंगा सूतगिरणी, माणगंगा साखर कारखाना आणि माणगंगा गारमेंट या थकबाकीदारांना जिल्हा बँकेने नोटिसा बजावल्या आहेत. या चार संस्थांची थकबाकी दीडशे कोटींच्या घरात आहे. त्यामुळे ही वसुली झाली, तर जिल्हा बॅँकेचे यंदाचे शंभर कोटी नफ्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. त्यामुळे बॅँक प्रशासन आता सरसावले असून, कडक भूमिका स्वीकारली आहे. गतवर्षीच्या नफ्याचा विचार करता यंदाचे उद्दिष्ट फारसे अवघड नव्हते. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या विचित्र धोरणामुळे बॅँकेसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. नोटाबंदीच्या काळात दोन ते तीन महिने ठप्प असलेले जिल्ह्यातील बॅँकेचे व्यवहार आणि ३१५ कोटींच्या जुन्या शिल्लक रकमेवरील व्याजाचा फटका या दोन गोष्टी सर्वांत जास्त चिंतेच्या होत्या. तरीही मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करून उद्दिष्टपूर्ती करण्याची धडपड सुरू आहे. (प्रतिनिधी)