शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

तासगाव बाजार समितीत जिल्हा बँकेचा फॉर्म्युला?

By admin | Updated: May 30, 2015 00:35 IST

राष्ट्रवादी-भाजपात १२-७ चा तोडगा : खासदार संजय पाटील-सुरेश पाटील भेटीची चर्चा

दत्ता पाटील - तासगाव -जिल्हा बँकेपाठोपाठ तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पक्षविरहीत आघाडी होणार असल्याच्या चर्चेने तालुक्यात वेग घेतला आहे. खासदार संजय पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्यात गोपनीय बैठक झाल्याचे वृत्त असून राष्ट्रवादीला १२ आणि भाजपला ७ जागा, असा फॉर्म्युलादेखील निश्चित झाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची अंतिम मतदार यादी २० मे रोजी प्रसिध्द झाली आहे. त्यानंतर १५ दिवसात म्हणजे, ४ जूनपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. गतवेळची निवडणूक विद्यमान खासदार संजय पाटील राष्ट्रवादीत असल्यामुळे आर. आर. पाटील आणि संजय पाटील गटाने एकत्रितपणे लढवली होती. त्यामुळे गतवेळची निवडणूक एकतर्फीच झाली होती. खासदार संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप असे दोन तुल्यबळ पक्ष आमने-सामने आहेत. निवडणूक झाल्यास या दोन्ही पक्षांत धुमशान होणार आहे. परंतु नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्रित आले होते. खासदार संजय पाटील आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांनी एका गाडीत बसून जिल्ह्यात प्रचार केला होता. अगदी निवडणुकीनंतरही अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने आणि मांजर्डे (ता. तासगाव) येथे पाणी योजनेच्या बैठकीच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्रित आले होते. जिल्हा बँकेच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी वापरलेला फॉर्म्युला, तासगावच्या बाजार समितीच्या निवडणुकीतही वापरला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. खासदार पाटील आणि सुरेश पाटील यांच्यात या निवडणुकीच्या निमित्ताने गुफ्तगू झाले आहे. राष्ट्रवादीला १२ आणि भाजपला ७ जागांचे वाटप करण्यापर्यंत या दोन्ही नेत्यांत चर्चा झाली असल्याचे समजते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर रितसर बैठका घेण्यात येतील. कार्यकर्त्यांशी चर्चा करून या फॉर्म्युल्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस काय करणार ?गतवेळच्या बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. यावेळी काँग्रेसची धुरा तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्या खांद्यावर आहे. पाटील आणि भाजपचे नेते खासदार संजय पाटील यांच्यात फार सख्य नाही. ते पतंगराव कदम गटाचे आहेत. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी करणार, की स्वतंत्र पॅनेल लावणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तासगावचे वातावरण तापणार आहे. मतदार संघ आणि मतदार संख्यामतदार संघ मतदार संख्या जागासहकारी संस्था ९३३ ११ग्रामपंचायत ६६३ ४व्यापारी २०१ २प्रक्रिया संस्था ५९ १हमाल, तोलाईदार ४३ १एकूण १८९९ १९