फोटो ओळ : कोंतवबोबलाद (ता. जत) येथे तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते भाजीपाला वाटप केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : चिकलगी श्रीसंत बागडेबाबा भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांनी जत तालुक्यात कोरोना लाॅकडाऊनच्या संकटात सलग दुसऱ्या वर्षी भाजीपाल्या वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वत्तीने भाजीपाला वाटप केला.
कोरोना संकटात कुटुंबाला मदतीचा हात म्हणून भाजीपाला वाटप मानवमित्र संघटनेच्या मदतीने केली जात आहे. तालुक्यातील बंडगरवाडी, लकडेवाडी, जाडरबोबलाद सोन्याळ, गारळेवाडी १, २, कोंतवबोबलाद करेवाडी, गुलगुंजनाळ, मोटेवाडी(को. बो.) या गावात भाजीपाला वाटप तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील इतर गावांना भाजीपाला वाटप केला जाणार असल्याची मााहिती तुकाराम महाराज यांनी दिली.
दत्ता सावळे, सिदराया मोरे, नागनाथ भिसे, प्रशांत कांबळे, राहुल माने भाजीपाला वाटपाचे नियोजन करीत आहेत.